Monday , September 21 2026
Breaking News

तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत श्री रवळनाथ हायस्कूलचा हॉलीबॉल संघ प्रथम

Spread the love

शिवठाण : श्री चांगळेश्वरी शिक्षण संस्था, येळूर संचलित श्री रवळनाथ हायस्कूल, शिवठाण (ता. खानापूर)च्या हॉलीबॉल संघाने तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. उत्कृष्ट सांघिक खेळ, जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर संघाने हे उल्लेखनीय यश संपादन केले.

हॉलीबॉल संघाचा कर्णधार कुमार लक्ष्मण मादार याने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले. तसेच सहकाऱ्यांना योग्य मार्गदर्शन व प्रोत्साहन देत संघाला विजेतेपद मिळवून देण्यात त्याची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली.

वैयक्तिक क्रीडा प्रकारांतही उल्लेखनीय यश

विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वैयक्तिक क्रीडा प्रकारांतही दमदार कामगिरी केली.

१०० मीटर रिले – प्रथम क्रमांक : वैभवी पाटील, पवित्रा परीट, नम्रता पाटील, दिपाली शिरोडकर

उंच उडी – प्रथम क्रमांक : नम्रता पाटील

लांब उडी – प्रथम क्रमांक : दिपाली शिरोडकर

तिहेरी उडी – द्वितीय क्रमांक : नम्रता पाटील

तिहेरी उडी – तृतीय क्रमांक : वैभवी पाटील

या यशासाठी क्रीडा शिक्षक पी. टी. चोपडे, संघ व्यवस्थापक एन. व्ही. नाईक व व्ही. बी. पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या नियमित सरावाला योग्य दिशा देत त्यांनी खेळाडूंना स्पर्धेसाठी सज्ज केले.

या उल्लेखनीय कामगिरीसाठी शाळेचे मुख्याध्यापक पी. ए. पाटील, संस्थेचे चेअरमन वाय. एन. मजुकर आणि सेक्रेटरी प्रसाद मजुकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

विद्यालयाच्या या यशाबद्दल शिक्षकवर्ग, कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच पंचक्रोशीतील क्रीडाप्रेमींनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले असून, त्यांच्या पुढील क्रीडा वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *