








कला महोत्सवात गुणवंतांचा सन्मान
निपाणी (वार्ता) : पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती झाल्यामुळे गुणवत्तेनुसार योग्य आणि पात्र शिक्षक मिळतात, त्यामुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास सुधारतो व शिक्षणाची गुणवत्ता निश्चितपणे वाढण्यास मदत होत असल्याचे मत कुन्नूर येथील सरकारी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका अंजली अमृतसम्मन्नावर यांनी व्यक्त केले. कुर्ली येथील एच जे सी चीफ फौंडेशन व राज्य मराठी विकास संस्था -मुंबई यांच्यातर्फे कला महोत्सवानिमित्त आयोजित गुणवंतांच्या सन्मान सोहळ्यात त्या बोलत होत्या. राजगिरी मठाचे मठाधीश सुदर्शन गिरी महाराज यांचे दिव्य सानिध्य लाभले.
एस. एस. चौगुले यांनी प्रास्ताविक केले. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन झाले. यानंतर पवित्र पोर्टल मधून निवड झालेल्या शिल्पा खोत व आदर्श शिक्षिका वैजयंती इंदलकर यांचा सत्कार करण्यात आला.
सुदर्शन गिरी यांनी, नवनियुक्त शिक्षकांचा सत्कार हा त्यांच्या कष्टाचे आणि यशाचे चीज करणारा आनंददायी सोहळा असल्याचे सांगितले. शिल्पा खोत यांनी सत्काराबाबत कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमास शामराव चौगुले, संदीप पिष्टे, डी. एस. चौगुले, चंद्रकांत कोंडेकर, शिवाजी चौगुले, राजाराम मगदूम, सीताराम चौगुले, सुवर्णा चौगुले, भामाबाई चौगुले, वासंती बोंगार्डे, यांच्यासह महिला उपस्थित होत्या. आराध्या चौगुले यांनी सूत्रसंचालन केले. शरयू चौगुले यांनी आभार मानले.

Belgaum Varta Belgaum Varta