






वडगाव : संयुक्त पाटील गल्ली, वडगाव येथे उभारण्यात आलेल्या भव्य-दिव्य किल्ल्याचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडला.
या उद्घाटन सोहळ्याला शहापूर पोलीस स्टेशनच्या सीपीआय सीमानी यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच माजी एपिएमसी सदस्य महेश जुवेकर, माजी नगरसेवक मनोहन हलगेकर, महेश गडकरी, विजय पाटील, महेश सुभे, अशोक घगवे आणि गोपाळ हलगेकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते किल्ल्याचे उद्घाटन करण्यात आले. किल्ल्याची भव्य रचना आणि आकर्षक सजावट उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होती. या उपक्रमातून ऐतिहासिक गडकिल्ल्यांचा वारसा, छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम आणि दुर्गसंस्कृती जपण्याचा सुंदर संदेश देण्यात आला.
या सोहळ्यात गल्लीतील पुरुष मंडळी तसेच महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. सर्वांच्या एकजुटीने आणि उत्स्फूर्त सहकार्याने उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला.
Belgaum Varta Belgaum Varta