






बेळगाव : कर्नाटक सरकारने शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू केली असून, सरकारने मराठी माध्यमाच्या २०० जागा भरण्याचे आश्वासन दिले होते, ऑनलाईन अर्ज प्रक्रियेत मात्र ७८ जागांसाठी अर्ज मागविण्यात आल्याची अधिसूचना काढण्यात आली आहे. यामध्ये तातडीने सुधारणा करण्यात यावी आणि आश्वासनाप्रमाणे २०० जागांसाठी शिक्षक भरती प्रक्रिया राबविण्यात यावी यासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगावच्या वतीने उद्या मंगळवार दिनांक २४ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.०० वाजता जिल्हा शिक्षणाधिकाऱ्याना निवेदन देण्यात येणार आहे तरी सर्वांनी जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालय क्लबरोड बेळगाव येथे उपस्थित रहावे, असे आवाहन अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta