






गोकुळचे माजी संचालक रणजितसिंह पाटील यांच्या मुलाच्या कारची धडक; अपघातानंतर घटनास्थळावरून पलायन केल्याची माहिती
कोल्हापूर : कोल्हापुरात मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविण्याच्या प्रकारातून भीषण अपघात घडला असून, यात दोन चुलत भावांचा जागीच मृत्यू झाला आहे. गोकुळ दूध संघाचे माजी संचालक रणजितसिंह पाटील यांचा मुलगा पद्मसिंह पाटील याच्या कारने दिलेल्या धडकेत उमेश पाथरूड आणि गणेश पाथरूड यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे कोल्हापूर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
सोमवारी मध्यरात्री शिवाजी विद्यापीठ परिसरात हा अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार, पद्मसिंह पाटील याच्या कारने रस्त्यावरील उमेश पाथरूड आणि गणेश पाथरूड या दोघांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर कारचालक पद्मसिंह पाटील घटनास्थळावरून पळून गेल्याचे वृत्त आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, गोकुळ दूध संघाच्या अलीकडील निवडणुकीनंतर कोल्हापूरच्या सहकार क्षेत्रातील राजकारण चर्चेत असतानाच या घटनेमुळे राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta