Sunday , November 22 2026
Breaking News

गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा; राजेश पाटील अध्यक्षपदी

Spread the love

 

 

 

समविचारी आघाडीच्या शशिकांत पाटील-चुयेकर यांचा १६ विरुद्ध १३ मतांनी पराभव; चंदगडला ६३ वर्षांनंतर अध्यक्षपदाचा मान

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणाचे लक्ष लागून राहिलेल्या गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महायुतीने बाजी मारली आहे. चंदगडचे माजी आमदार राजेश पाटील यांची संघाच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्यांनी समविचारी आघाडीचे उमेदवार शशिकांत पाटील-चुयेकर यांचा १६ विरुद्ध १३ मतांनी पराभव केला.

राजेश पाटील यांच्या निवडीमुळे चंदगड तालुक्याला तब्बल ६३ वर्षांनंतर गोकुळच्या अध्यक्षपदाचा मान मिळाला आहे. या विजयामुळे महायुतीने गोकुळवरील आपले वर्चस्व सिद्ध केले असून, विरोधी गटाचे नेते सतेज पाटील यांच्यासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.

अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर राजेश पाटील यांनी सर्व संचालकांना विश्वासात घेऊन काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देऊन निर्णय घेतले जातील. गोकुळचे वैभव पुन्हा वाढवून राज्यातील अग्रगण्य दूध संघाला राष्ट्रीय स्तरावर नेण्याचा आपला प्रयत्न असेल, असे त्यांनी सांगितले.

गेल्या वर्षभरात संघाला झालेला तोटा भरून काढण्याबरोबरच सर्व घटकांना सोबत घेऊन गोकुळचा सर्वांगीण विकास करण्यावर भर देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

About Belgaum Varta

Check Also

गोकुळच्या निवडणुकीत ९९.९६ टक्के विक्रमी मतदान; १२ पैकी १० तालुक्यांत शंभर टक्के मतदान!

Spread the love  कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीत रविवारी (१८ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *