Sunday , November 22 2026
Breaking News

बेळगावात जाण्यापासून रोखल्यास कर्नाटक मंत्र्यांना महाराष्ट्रात बंदी घालू; शिवसेना ठाकरे गटाचा इशारा

Spread the love

 

कोल्हापूर : बेळगाव येथे २ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या मराठी भाषिकांच्या महामेळाव्याला महाराष्ट्रातील नेते आणि कार्यकर्त्यांना जाण्यापासून रोखल्यास कर्नाटकातील मंत्री, आमदार आणि खासदारांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने दिला आहे.

बेळगावमध्ये कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार असून, त्याच पार्श्वभूमीवर मराठी भाषिकांचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला महाराष्ट्रातील विविध राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते उपस्थित राहतात. मात्र, अधिवेशनाच्या काळात महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगावच्या सीमेवर रोखण्यात येत असल्याने वाद निर्माण होतो.

या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून महामेळाव्यासाठी जाणाऱ्या महाराष्ट्रातील नेते आणि कार्यकर्त्यांना अडवू नये, असे आवाहन करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगावमध्ये जाण्यापासून रोखल्यास कर्नाटकातील मंत्री, आमदार आणि खासदारांना महाराष्ट्रात फिरू दिले जाणार नाही, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. सीमेवर अशा प्रकारची अडवणूक झाल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असेही शिष्टमंडळाने निदर्शनास आणून दिले.

शिवसेनेचे उपनेते संजय पवार आणि संपर्कप्रमुख विजय देवणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने हे निवेदन दिले. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

गोकुळच्या निवडणुकीत ९९.९६ टक्के विक्रमी मतदान; १२ पैकी १० तालुक्यांत शंभर टक्के मतदान!

Spread the love  कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीत रविवारी (१८ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *