Sunday , November 22 2026
Breaking News

बेळगाव एसी कार्यालयावर लोकायुक्तांचा छापा; लाच घेताना एसडीए कर्मचारी रंगेहात पकडला

Spread the love

 

बेळगाव : सरकारी काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी बेळगाव येथील उपविभागाधिकारी (एसी) कार्यालयातील एसडीए कर्मचाऱ्याला लोकायुक्त अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. पद्माकर पाटील असे अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.

शुभम अप्पाराव यांनी यासंदर्भात लोकायुक्त पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारदाराची प्रकरणे एसी न्यायालयात वर्ग करून देण्यासाठी पद्माकर पाटील यांनी ३० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. त्यापैकी पहिला हप्ता म्हणून दोन हजार रुपये देण्यास सांगितले होते.

लाचेच्या मागणीला कंटाळून तक्रारदाराने लोकायुक्तांकडे धाव घेतली. तक्रारीची दखल घेत लोकायुक्त अधिकाऱ्यांनी एसी कार्यालयात सापळा रचला. यावेळी दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना पद्माकर पाटील यांना रंगेहात पकडण्यात आले.

त्यानंतर लोकायुक्त अधिकाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे.

लोकायुक्त पोलीस अधीक्षक प्रसन्न देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सरकारी कार्यालयातच लाच स्वीकारताना कर्मचाऱ्याला पकडण्यात आल्याने बेळगावमध्ये या घटनेची चर्चा सुरू आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावात मटका जुगार अड्ड्यांवर पोलिसांचे छापे; चौघांना अटक

Spread the love  ९,८०० रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य जप्त बेळगाव : शहरातील अवैध मटका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *