Sunday , November 22 2026
Breaking News

येळ्ळूरच्या रायफलमन दिनेश कार्लेकर यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी; तीन कांस्यपदकांची कमाई!

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील येळ्ळूर गावचे सुपुत्र आणि भारतीय सैन्यदलातील रायफलमन दिनेश गंगाराम कार्लेकर यांनी आंतरराष्ट्रीय अश्वारूढ टेंट पेगिंग स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. जॉर्डनमधील अकाबा येथे 12 ते 14 नोव्हेंबर 2026 या कालावधीत झालेल्या आयटीपीएफ विश्वचषक टेंट पेगिंग 2026 स्पर्धेत त्यांनी तीन कांस्यपदकांची कमाई केली.

या स्पर्धेत दिनेश कार्लेकर यांनी वैयक्तिक टेंट पेगिंग (लान्स) प्रकारात कांस्यपदक पटकावले. तसेच सांघिक गटातील रिंग अँड पेग (लान्स), लेमन अँड पेग (तलवार) आणि रिले (लान्स व तलवार) या प्रकारांतही त्यांनी सहभाग घेत कांस्यपदक मिळवले. याशिवाय वैयक्तिक सर्वांगीण अजिंक्यपद स्पर्धेत (लान्स आणि तलवार) त्यांनी कांस्यपदक पटकावून आपल्या कौशल्याची छाप पाडली.

विश्वचषकाच्या एकूण सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघाने 436 गुणांसह पाचवे स्थान मिळवले.

भारतीय सैन्यदलात कार्यरत असलेल्या दिनेश कार्लेकर यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करून मिळवलेले हे यश बेळगाव जिल्ह्यासह संपूर्ण कर्नाटक राज्यासाठी अभिमानास्पद ठरले आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे येळ्ळूर गावाची कीर्ती आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली असून, नवोदित खेळाडूंना त्यांच्याकडून निश्चितच प्रेरणा मिळणार आहे.

रायफलमन दिनेश गंगाराम कार्लेकर यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील क्रीडा वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावात मटका जुगार अड्ड्यांवर पोलिसांचे छापे; चौघांना अटक

Spread the love  ९,८०० रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य जप्त बेळगाव : शहरातील अवैध मटका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *