Sunday , November 22 2026
Breaking News

महात्मा फुले सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने सुभेदार पांडुरंग बिर्जे यांचा हृद्य सत्कार

Spread the love

 

उचवडे : (ता. खानापूर) उचवडे येथील महात्मा फुले सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने माजी सैनिक सुभेदार पांडुरंग बिर्जे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन हृद्य सत्कार करण्यात आला.

सुभेदार पांडुरंग बिर्जे हे सन १९९६ मध्ये ४ मराठा बटालियनमध्ये सैनिक म्हणून भरती झाले होते. देशसेवेत तब्बल ३० वर्षे निष्ठेने सेवा बजावून दि. ३१ ऑगस्ट २०२६ रोजी ते सुभेदार या पदावरून सेवानिवृत्त झाले. त्यांच्या या गौरवशाली देशसेवेबद्दल वाचनालयाच्या वतीने हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष शिवाजी हसनेकर हे होते. त्यांच्या व सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल पाटील यांच्या हस्ते बिर्जे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना विठ्ठल पाटील यांनी बिर्जे यांच्या शिस्तप्रिय, कर्तव्यनिष्ठ व देशप्रेमी कार्याचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी अभिष्टचिंतन केले. बिर्जे यांची सेवा ही तरुण पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाश पाटील यांनी केले, तर शट्टूपा यसकोंडे यांनी आभार मानले. यावेळी ग्रामस्थ, वाचनालयाचे सभासद व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावात मटका जुगार अड्ड्यांवर पोलिसांचे छापे; चौघांना अटक

Spread the love  ९,८०० रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य जप्त बेळगाव : शहरातील अवैध मटका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *