Sunday , November 22 2026
Breaking News

चौराशीदेवी सौहार्द सहकारी संस्थेच्या मच्छे शाखेचे नवीन वास्तूत दिमाखात उद्घाटन

Spread the love

 

संस्थेच्या प्रगतीच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल

मच्छे : चौराशीदेवी मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सौहार्द सहकारी संस्थेच्या मच्छे शाखेचे स्थलांतर करून नवीन प्रशस्त वास्तूमध्ये शाखेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात व दिमाखात करण्यात आले.

मच्छे येथील प्रतिष्ठित नागरिक भोंमाजी हावळ यांच्या शुभहस्ते तसेच संस्थेचे चेअरमन डॉ. डी. ई. नाडगौडा यांच्या प्रमुख उपस्थितीत या नवीन शाखेचे उद्घाटन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे संचालक डी. जी. पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी प्रणाम हॉटेलचे मालक ज्योतिबा गावडे, नवभारत सोसायटीचे चेअरमन, मच्छे परिसरातील प्रतिष्ठित नागरिक, तसेच खानापूर येथील संस्थेचे सभासद व भागधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष शिवाजी देसूरकर, संचालक मारुती पाखरे, कृष्णा शेवणगेकर, विश्वास देसाई यांच्यासह संस्थेचे सर्व संचालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन एस. एस. कोलकार यांनी केले.

यावेळी बोलताना मान्यवरांनी संस्थेच्या आजवरच्या प्रगतीचे विशेष कौतुक केले. संस्थेचा आर्थिक कारभार अत्यंत सुरळीत, पारदर्शक आणि शिस्तबद्ध पद्धतीने सुरू असून चेअरमन व सर्व संचालक मंडळाच्या एकजुटीने आणि सहकार्याने संस्थेने सहकार क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे, असे गौरवोद्गार काढण्यात आले.

मच्छे शाखेची पूर्वीची जागा अपुरी पडत असल्यामुळे ग्राहकांना अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात, शाखेचा व्यवसाय विस्तारावा आणि सभासदांना सुलभ व दर्जेदार आर्थिक सेवा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने नवीन प्रशस्त वास्तूमध्ये शाखेचे स्थलांतर करण्यात आले आहे. संस्थेच्या वाढत्या कार्यक्षेत्राचा आणि प्रगतीचा हा एक महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

संस्थेच्या विस्तारासाठी, आर्थिक स्थैर्यासाठी आणि प्रत्येक शाखेच्या सर्वांगीण विकासासाठी चेअरमन डॉ. डी. ई. नाडगौडा व सर्व संचालक मंडळ घेत असलेल्या पुढाकाराचे उपस्थित मान्यवरांनी विशेष कौतुक केले.

संस्थेच्या सहकार, विश्वास आणि पारदर्शक कारभाराच्या बळावर भविष्यातही संस्थेची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो, अशा शुभेच्छा यावेळी उपस्थित मान्यवरांनी दिल्या.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावात मटका जुगार अड्ड्यांवर पोलिसांचे छापे; चौघांना अटक

Spread the love  ९,८०० रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य जप्त बेळगाव : शहरातील अवैध मटका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *