Sunday , November 22 2026
Breaking News

बेळगावात ड्रॅगन चाकू घेऊन फिरणाऱ्या दोघांना अटक

Spread the love

 

 

 

मार्केट पोलिसांच्या अँटी स्टॅबिंग पथकाची कारवाई; भरतेश कॉलेज परिसरात चाकू जप्त

बेळगाव : शहरात वाढत्या चाकूहल्ल्यांच्या घटनांना आळा घालण्यासाठी गस्त घालणाऱ्या मार्केट पोलीस ठाण्याच्या अँटी स्टॅबिंग पथकाने धारदार ड्रॅगन चाकू बाळगून फिरणाऱ्या दोघांना अटक केली आहे.

१० नोव्हेंबर रोजी मार्केट पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांकडून तपासणी सुरू असताना भरतेश कॉलेजच्या कार पार्किंगजवळ सार्वजनिक ठिकाणी दोघे संशयास्पदरीत्या आढळून आले. पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे लोखंडी धारदार ड्रॅगन चाकू आढळून आला.

याप्रकरणी तिलकवाडी येथील चौगुलेवाडीचा रहिवासी यश उदय हन्निकेरी (वय २०) आणि बेळगावातील तहसीलदार गल्ली येथील शिरीष ऊर्फ श्रीकिरण चौगुले (वय २३) यांना चाकूसह ताब्यात घेण्यात आले.

याप्रकरणी मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २३७/२०२६ नुसार भारतीय शस्त्रास्त्र कायदा १९५९ मधील कलम २५(१) आणि कर्नाटक पोलीस कायदा १९६३ मधील कलम ९७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

पीएसआय मणिकंठ पूजारी आणि मार्केट पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. या कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्तांनी पथकाचे कौतुक केले.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावात मटका जुगार अड्ड्यांवर पोलिसांचे छापे; चौघांना अटक

Spread the love  ९,८०० रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य जप्त बेळगाव : शहरातील अवैध मटका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *