Sunday , November 22 2026
Breaking News

बसस्थानक परिसरात दहशत माजविणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला अटक

Spread the love

 

 

नागरिकांना शिवीगाळ, दमदाटी करून शांततेचा भंग; न्यायालयीन कोठडीत रवानगी

बेळगाव : मध्यवर्ती बसस्थानक परिसरात नागरिकांना शिवीगाळ करून आरडाओरड व दमदाटी करीत दहशत निर्माण करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला मार्केट पोलिसांनी अटक केली आहे. जुबेर अब्दुल वहाब शेख (वय ३६, रा. पाचवा क्रॉस, आझादनगर, बेळगाव) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

शनिवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास जुबेर हा मध्यवर्ती बसस्थानकाजवळ उभा राहून ये-जा करणाऱ्या नागरिकांना उद्देशून ओरडत होता. शिवीगाळ व दमदाटीमुळे परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे सार्वजनिक शांततेचा भंग होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

जुबेर हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध यापूर्वी माळमारुती आणि एपीएमसी पोलीस ठाण्यांत विविध गुन्हे दाखल आहेत. या पार्श्वभूमीवर मार्केट पोलीस ठाण्याचे निरीक्षक जे. एम. कालीमिरची यांनी त्याच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावात मटका जुगार अड्ड्यांवर पोलिसांचे छापे; चौघांना अटक

Spread the love  ९,८०० रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य जप्त बेळगाव : शहरातील अवैध मटका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *