Monday , November 23 2026
Breaking News

सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन; एकावर पोलिसांची कारवाई

Spread the love

 

बेळगाव : सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीररीत्या मद्यप्राशन करणाऱ्या एका व्यक्तीवर पोलिसांनी कारवाई केली. ही घटना रविवार, दि. २२ नोव्हेंबर २०२६ रोजी घडली.

प्रशांत दशरथ सुतार (वय २९, रा. गंगाई गल्ली, मजगाव, बेळगाव) असे कारवाई करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

औद्योगिक परिसरातील पराठा कॉर्नरजवळ सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणे कायद्याने निषिद्ध असल्याची माहिती असूनही प्रशांत सुतार हा मद्यप्राशन करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

यावेळी एएसआय आर. एच. फराणी यांनी पोलीस कर्मचारी व सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाड टाकून संबंधित व्यक्तीवर कारवाई केली.

याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ९७/२०२६ अन्वये कर्नाटक अबकारी कायदा १९६५ मधील कलम १५(अ) आणि ३२(३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

About Belgaum Varta

Check Also

बिम्स रुग्णालयाजवळ अमली पदार्थ विक्रीवर एपीएमसी पोलिसांचा छापा; एकाला अटक

Spread the love  ३.६० ग्रॅम हेरॉईन जप्त; ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत बेळगाव : शहरातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *