






निपाणी (वार्ता) : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त निपाणी येथील आश्रय नगरातील कार्तिक स्वामी मंदिरामध्ये मंगळवारी (ता. २४) कार्तिक स्वामी दर्शन सोहळा आयोजित केला आहे. त्यानिमित्त दिवसभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत. पहाटे (ता.२४) कार्तिक स्वामींच्या मूर्तीस अभिषेक घालण्यात येणार आहे. त्यानंतर दर्शनासाठी दिवसभर मंदिर खुले राहणार आहे.
सोमवारी (ता.२३) रात्री संत बाळूमामा संगीत भजनी मंडळाची भजन सेवा झाली. मंगळवारी (ता.२४) सकाळी ११ वाजता महाप्रसादाचे वाटप होणार आहे. दुपारी ३ वाजता रांगोळी स्पर्धांचे आयोजन केले आहे. त्यातील विजेत्यांना अनुक्रमे २ हजार १ रुपये,१ हजार १ रुपये, ७०१ रुपये आणि ५०१ रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत. सायंकाळी ७ वाजता कार्तिक दीपोत्सवाचा कार्यक्रम होणार आहे. कार्तीक स्वामी दर्शन हे कार्तिक महिन्यातील पौर्णिमेला कृतिका नक्षत्रावेळी होणार आहे. या दिवशी कार्तिक स्वामी दर्शन घेऊन भाविकांनी पुण्य संपादन करावे, असे आवाहन कार्तिक स्वामी मंदिर प्रमुख माजी नगराध्यक्ष प्रवीण भाटले -सडोलकर आणि राहुल सडोलकर यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta