Sunday , November 22 2026
Breaking News

बोरगाव जय गणेश को. ऑप. सोसायटीच्या हिरेकोडी शाखेचे उद्घाटन

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील जय गणेश बहुउद्देशीय को. ऑप. सोसायटीच्या हिरेकोडी शाखेचे उद्घाटन शिवप्रसाद देवरू यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष अभयकुमार मगदूम
होते.
शिवप्रसाद देवरे यांनी, वित्तीय संस्था ही केवळ पैशाच्या देवाणघेवाणीची प्रणाली नसून, ती अनेक कुटुंबांच्या स्वप्नांना आधार देणारी आणि त्यांच्या कठीण काळात त्यांना साहाय्य करणारी शक्ती आहे. हे ओळखून, बोरगावचे अभय कुमार मगदूम सहकारी क्षेत्रात कार्यरत असल्याचे सांगितले.
कार्यक्रमास सचिन रोडे, उपाध्यक्ष महादेव खवटे, मलिकार्जुन चोगुले, शंकर टोणे, प्रल्हाद पांडव, श्रीमंत हत्तीवार, दुदाप्पा कामठे, रामा बंडगर, रुद्रप्पा चोगुले, बाळासाहेब कोठे, चिदानंद चोगुले, सूर्यकांत हत्तीवार, धोंडिराम पाटील, सुरेश चोगुले, महेंद्र चोगुले, सुरेश चोगुले यांच्यासह संचालक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

निपाणी भागात हुडहुडी वाढली

Spread the love  पारा १६ अंश सेल्सिअसवर ; जनजीवन गारठल्याने कामांच्या वेळात बदल निपाणी (वार्ता) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *