Sunday , November 22 2026
Breaking News

ममदापूर (के.एल.) येथील प्रति तुळजाभवानी मंदिरात कार्तिक दीपोत्सव

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : ममदापूर (के. एल.) येथे श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर -सरकार यांनी स्थापन केलेल्या प्रति तुळजाभवानी मंदिरामध्ये कार्तिक दीपोत्सवाचा कार्यक्रम पार पडला. श्रीकांत पुजारी यांनी निपाणी संस्थांनचे श्रीमंत दादाराजे निपाणकर सरकार यांचे स्वागत केले.
श्रीमंत दादाराजे निपाणकर व श्रीमंत सम्राज्यलक्ष्मीराजे निपाणकर यांच्या हस्ते पौरोहित्य शरद पुजारी यांच्या उपस्थितीत विधिपूर्वक दीपस्तंभाचे पूजन झाले. त्यानंतर भाविकांनी मंदिर परिसरात हजारो दिवे लावून मंदिर परिसर लख्ख उजळून काढला. श्रीमंत निपाणकर यांच्या हस्ते तुळजाभवानीची महाआरती करून दुधाचा नैवेद्य देण्यात आला. मंदिर परिसरात आकर्षक रांगोळ्या रेखाटण्यासह फुलांची आरास करण्यात आली होती.
कार्यक्रमास श्रीमंत युवराज सिद्धोजीराजे निपाणकर, श्रीमंत सुकीर्तीराजे, श्रीमंत राजेश्वरीराजे निपाणकर, प्रमोद पुजारी, प्रसाद पुजारी, राजू पुजारी, रवी कदम, अमोल आवटे, चंद्रकांत पुजारी, सागर पुजारी, श्रेयस आबने, सुरज नारे त्यांच्यासह भाविक उपस्थित होते. ओंकार पुजारी यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

निपाणी भागात हुडहुडी वाढली

Spread the love  पारा १६ अंश सेल्सिअसवर ; जनजीवन गारठल्याने कामांच्या वेळात बदल निपाणी (वार्ता) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *