Monday , November 23 2026
Breaking News

मार्केट पोलिसांच्या ‘अँटी स्टॅबिंग स्क्वॉड’ची कारवाई; धारदार चाकूसह एकाला अटक

Spread the love

 

बेळगाव : शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून मार्केट पोलीस ठाण्याच्या हद्दीत राबविण्यात आलेल्या ‘अँटी स्टॅबिंग स्क्वॉड’च्या मोहिमेत एका तरुणाला धारदार चाकूसह अटक करण्यात आली.

सोमवार, दि. २३ नोव्हेंबर २०२६ रोजी मार्केट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हनमन्नावर ट्रेडर्स गोदामाच्या गेटजवळ सार्वजनिक ठिकाणी ही कारवाई करण्यात आली.

महम्मदजिया सय्यद शेख (वय २६, रा. काकर गल्ली, बेळगाव) हा बेकायदेशीररीत्या आपल्याजवळ धारदार चाकू बाळगून कोणताही गुन्हेगारी कृत्य करण्याच्या उद्देशाने उभा असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर मार्केट पोलीस ठाण्याचे पीएसआय मणिकंठ पूजारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला धारदार चाकूसह ताब्यात घेतले.

याप्रकरणी मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २५४/२०२६ अन्वये भारतीय शस्त्र कायदा १९५९ चे कलम २७(१) आणि कर्नाटक पोलीस कायदा १९६३ च्या कलम ९७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

बिम्स रुग्णालयाजवळ अमली पदार्थ विक्रीवर एपीएमसी पोलिसांचा छापा; एकाला अटक

Spread the love  ३.६० ग्रॅम हेरॉईन जप्त; ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत बेळगाव : शहरातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *