






३.६० ग्रॅम हेरॉईन जप्त; ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
बेळगाव : शहरातील बिम्स रुग्णालयाजवळ सार्वजनिक ठिकाणी अमली पदार्थांची विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर एपीएमसी पोलिसांनी छापा टाकून एका आरोपीला अटक केली. या कारवाईत ७२ हजार रुपये किमतीचे ३.६० ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आले.
रविवार, दि. २२ नोव्हेंबर २०२६ रोजी एपीएमसी पोलीस ठाण्याचे पीएसआय एस. के. होन्नेनवर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह बिम्स रुग्णालयाजवळील सार्वजनिक ठिकाणी ही कारवाई केली.
यावेळी अफजल रशीद बेपारी (वय ४१, रा. उज्वल नगर, बेळगाव) हा हेरॉईन हा अमली पदार्थ जवळ बाळगून विक्री करत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडील ३.६० ग्रॅम हेरॉईन जप्त केले.
याप्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १८०/२०२६ अन्वये अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा (NDPS Act) कलम २१(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून, न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta