





निपाणी (वार्ता) : रिक्षा-टॅक्सी-कॅब चालक-मालक कल्याणकारी महामंडळ’ स्थापन करून अर्थसंकल्पीय निधी मंजूर करावा. चालकांना सामाजिक आणि आर्थिक सुरक्षा प्रदान करावी. उबर आणि इतर कॅब कंपन्यांचे धोरण निश्चित करणे. सरकारने ॲप-आधारित कॅब कंपन्यांचा दर्जा आणि धोरण पारदर्शकपणे निश्चित करावे, यासह मागण्यासाठी येथील रिक्षा टॅक्सी वाहतूक महासंघातर्फे सोमवारी (ता.२३) तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
याशिवाय एटीएस केंद्र आणि परिवहन विभागातील भ्रष्टाचार थांबवावा.परवाना नूतनीकरण, फिटनेस पासिंग आणि एटीएस केंद्रांमध्ये चालकांना भेडसावणारा आर्थिक गैरवापर आणि भ्रष्टाचार थांबवण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी.चालकांसाठी सुरक्षित पार्किंग स्टँड उपलब्ध करून देणे आणि इतर प्रशासकीय अडचणी दूर कराव्यात.वाहन चालकाच्या शहर परवान्याचे जिल्हा परवान्यात रूपांतर करणे. ऑटो चालकांना घरे वाटप करून त्यांना ‘ऑटो कॉलनी’ असे नाव देण्यात यावे. आरटीओ कार्यालयातील पासिंग शुल्क कमी करण्यासह विविध मागण्या निवेदनात करण्यात आले आहेत.
तहसीलदार मुंजे यांनी निवेदन स्वीकारून वरिष्ठ अधिकाऱ्याकडे पाठवण्याचे आश्वासन दिले.
यावेळी राष्ट्रीय रिक्षा टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशन कर्नाटक राज्य अध्यक्ष गजानन खापे बेळगाव जिल्हा अध्यक्ष प्रवीण झळके, युवराज शेटके, महेश माकणे, नंदकुमार कांबळे, चंदू प्रशांत भोसले, विशाल कांबळे, वैभव कांबळे, जुगनू सकट, सदाशिव चव्हाण यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta