Sunday , November 22 2026
Breaking News

सांबरा मराठी शाळेचा शतकोत्तर सुवर्णमहोत्सव उत्साहात साजरा करण्याचा निर्धार

Spread the love

बेळगाव : सांबरा येथील सरकारी प्राथमिक मराठी शाळेच्या स्थापनेला १५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर शाळेचा शतकोत्तर सुवर्णमहोत्सव अपूर्व उत्साहात आणि एकोप्याने साजरा करण्याचा निर्धार करण्यात आला. यासंदर्भात शाळेच्या सभागृहात आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी एसडीएमसी अध्यक्ष लक्ष्मण जोई होते.

यावेळी महोत्सवाच्या आयोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. पुढील बैठकीत कार्यक्रमाची तारीख व रूपरेषा निश्चित करणे, तसेच विविध समित्यांची स्थापना करण्याचे ठरविण्यात आले. राजकीय पक्षभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येत हा ऐतिहासिक सोहळा साजरा करावा, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

शाळेची पटसंख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करणे, विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर व्याख्यानांचे आयोजन करणे आणि शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान देण्याचेही निश्चित करण्यात आले. महोत्सवाच्या आयोजनासाठी बॅचनुसार जबाबदाऱ्या स्वीकारून त्या पार पाडण्याची ग्वाही माजी विद्यार्थ्यांनी दिली. शाळेत अध्यापन केलेल्या सर्व शिक्षकांशी तसेच परगावी असलेल्या माजी विद्यार्थ्यांशी संपर्क साधून त्यांना महोत्सवाचे निमंत्रण देण्याबाबत चर्चा झाली.

यासंदर्भात पुढील रविवारी सकाळी १० ते ११ या वेळेत गावकरी आणि माजी विद्यार्थ्यांची बैठक घेण्याचे ठरविण्यात आले.

बैठकीत अरुण डूमरकी, मोहन जोई, मारुती यड्डी, मारुती जोगानी, महादेव अष्टेकर, शिवाजी जोगानी, शंकर कलखांबकर, सिद्राई गिरमल, महेश जत्राटी, मारुती नागन्नावर, मोहन अष्टेकर आदींनी आपले विचार मांडले. एसडीएमसी सदस्य यल्लाप्पा हरजी यांनी प्रास्ताविक केले व आभार मानले.

यावेळी मारुती चिंगळी, कल्लाप्पा पालकर, मोहन हरजी, अनिल चौगले, अशोक लोहार, तानाजी कलखांबकर, कृष्णा सुळेभावी, कृष्णा जोई, भुजंग गिरमल, दीपेश हवालदार, दीपक जाधव, एकनाथ सावगावकर, परशराम अचरेकर, विठ्ठल जोई, नारायण अप्पायचे, नागेश जत्राटी, महेश चिंगळी, गोपी पालकर, भावकांना सुनगार, सिद्धाप्पा हरजी, नर्सिंग गुरव, प्रवीण कारेकर, निखिल चिंगळी, उमेश मास्तमर्डी, अजय सुतार, सुभाष पालकर, मदन देसाई, शिवाजी अप्पायचे, शिवाजी चिंगळी, सोमनाथ पिंगट, सोमनाथ हरजी, यल्लेशी कांबळे, शिवाजी मालाई, लक्ष्मण जत्राटी, जोतिबा मुतगेकर, वासुदेव अचरेकर, सुरज सावगावकर यांच्यासह शंभरहून अधिक माजी विद्यार्थी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

ज्योती सेंट्रलचा फुटबॉलपटू ध्यानेश राज्यात अव्वल

Spread the love    बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूल, कॅम्प, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *