Monday , November 23 2026
Breaking News

निपाणीत जलवाहिन्यांच्या गळती सुरुच

Spread the love

 

हजारो लिटर पाण्याची नासाडी; नागरिकांची पाण्यासाठी भटकंती

निपाणी (वार्ता) : निपाणी शहर आणि उपनगरातील जलवाहिनींच्या गळतीचे सत्र वारंवार सुरू असल्याने पाणी वाया जाण्यासोबतच नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. जुन्या झालेल्या जलवाहिन्या आणि नियोजनाचा अभाव यामुळे उद्भवणारी समस्या आहे. राम मंदिर येरूडकर पेट्रोल पंप समोर मुख्य रस्त्यावर जलवाहिनीला गळती लागली आहे. त्यामुळे दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. तर दुसरीकडे शहरवासीयांचा पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
शहरांमध्ये अनेक वर्षांपूर्वी टाकलेल्या लोखंडी आणि सिमेंटच्या जलवाहिन्या अजूनही वापरल्या जात आहेत. त्या आता जीर्ण झाल्या आहेत. पाण्याचा दाब अचानक वाढल्याने कमकुवत झालेल्या जलवाहिन्यांना तडे जात आहेत. रुंदीकरण, भुयारी मार्ग, किंवा केबल टाकताना होणाऱ्या खोदकामामुळे अनेकदा मुख्य जलवाहिन्या फुटून पाण्याची नासाडी होत आहे. काही ठिकाणी दुरुस्ती करताना किंवा नवीन लाईन टाकताना निकृष्ट दर्जाच्या जलवाहिन्या वापरल्याने त्या लवकर खराब होत आहेत. परिणामी लाखो लिटर पाणी रस्त्यांवर वाहून वाया जात आहे. जलवाहिन्याना वारंवार गळती लागल्याने संबंधित परिसराचा पाणीपुरवठा खंडित होत आहे. परिणामी नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. गळती झालेल्या भागातून सांडपाणी किंवा माती पाईपलाईनमध्ये शिरल्याने नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा होऊन आजार वाढू लागले आहेत. रस्त्यावर पाणी साचल्याने रस्ते खचून खड्डे पडत आहेत.
————————————————————-
‘शहरातील पाणीपुरवठा योजनेच्या गेल्या तीन महिन्यापासून वारंवार गळकी लागत आहे. त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया जाऊन पाहण्यासाठी नागरिकांची धावाधाव सुरू आहे. काकडे नगरपालिका प्रशासनाने लक्ष देऊन योग्य उपाययोजना करावी’.
-ॲड. संजय चव्हाण, माजी नगरसेवक, निपाणी

About Belgaum Varta

Check Also

ममदापूर (के.एल.) येथील प्रति तुळजाभवानी मंदिरात कार्तिक दीपोत्सव

Spread the love  निपाणी (वार्ता) : ममदापूर (के. एल.) येथे श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर -सरकार यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *