Monday , November 23 2026
Breaking News

हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सतर्क; अतिरिक्त पोलीस महासंचालक विजय कुमार सिंग यांची बेळगावला भेट

Spread the love

 

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत कायदा व सुव्यवस्थेचा घेतला आढावा

बेळगाव : पुढील महिन्यात बेळगाव येथे होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्याची पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. अधिवेशन काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासह सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (ADGP) विजय कुमार सिंग यांनी बेळगावला भेट देऊन उत्तर विभागातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली.

या बैठकीला उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक (IGP) संदीप पाटील, बेळगावचे पोलीस आयुक्त प्रकाश निकम, हुबळी-धारवाडचे पोलीस आयुक्त भूषण बोरसे आणि बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक रामराजन उपस्थित होते. याशिवाय गदग, बागलकोट, हावेरी, विजयपूर आणि धारवाड जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षकही बैठकीत सहभागी झाले होते.

बैठकीत उत्तर विभागातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. गुन्हेगारीवर नियंत्रण, संवेदनशील भागांतील सुरक्षा व्यवस्था, पोलीस विभागाचे कामकाज आणि आगामी हिवाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने करावयाच्या पोलीस बंदोबस्ताबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी एडिजीपी विजय कुमार सिंग यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन करून कायदा व सुव्यवस्था राखण्याबाबत दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या. हिवाळी अधिवेशन शांततेत आणि सुरळीत पार पडावे, यासाठी पोलीस यंत्रणेने योग्य नियोजन करून सज्ज राहण्यावर बैठकीत भर देण्यात आला.

About Belgaum Varta

Check Also

सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन; एकावर पोलिसांची कारवाई

Spread the love  बेळगाव : सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीररीत्या मद्यप्राशन करणाऱ्या एका व्यक्तीवर पोलिसांनी कारवाई केली. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *