








उचगाव : येथील श्री मळेकरणी सौहार्द सहकारी संघाच्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा पुरस्कार व सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. उचगाव येथील शंकर-पार्वती मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे संस्थापक-चेअरमन जवाहरराव शंकरराव देसाई होते.
यावेळी चंद्रशेखर गायकवाड यांना ‘साहित्यभूषण’, विश्वास नारायण धुराजी यांना ‘समाजभूषण’, शंकर लक्ष्मण पाटील यांना ‘सेवाभूषण’, रविंद्र धोंडीबा पाटील यांना ‘शिक्षकभूषण’, प्रभाकर तरळे यांना ‘उचगावभूषण’, तर कु. साईशा पवन देसाई हिला ‘विद्याभूषण’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
याशिवाय सेवानिवृत्त शिक्षक व सभासद उदय लक्ष्मण देसाई, यल्लाप्पा नागो चोपडे, रणजित सावंत, अशोक आलगोंडी, यल्लाप्पा पावशे, निकिता पाटील, विवेकानंद देसाई, राधिका देसाई, सुरेंद्र देसाई आणि गोपाळ बिर्जे यांचा सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ नागरिक लक्ष्मण चंदगडकर तसेच स्वातंत्र्यसैनिक व माजी आमदार परशुरामभाऊ नंदिहळ्ळी यांचाही गौरव करण्यात आला.
विविध स्तरांवर प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांमध्ये कु. रक्षिता पावशे, कु. करुणा चौगुले, कु. कीर्ती देसाई, कु. समीक्षा कोवाडकर, कु. प्रियांका कुंडलकर, कु. संध्या गुंजीकर, कु. प्रज्ञा पाटील, कु. समीक्षा कदम, कु. पूजा देसाई, अनुप देसाई, कु. भूमिका देसाई आणि श्रेयस देसाई यांचा सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक व स्वागत व्हाईस चेअरमन अॅड. अनिल पावशे यांनी केले. सूत्रसंचालन बाळकृष्ण देसाई व प्रदीप झाझरी यांनी केले. कार्यक्रमास सोसायटीचे सभासद, संचालक मारुती सावंत, सुरेश बेनके, लुम्माण्णा पावशे, चंद्रकांत देसाई, किशोर पावशे, निळकंठ कुरबुर, कविता जाधव, प्रविणा देसाई, पवन देसाई, ठेवीदार, हितचिंतक व कर्मचारी उपस्थित होते. आभार सेक्रेटरी के. एन. कदम यांनी मानले.

Belgaum Varta Belgaum Varta