






महिलांसाठीही दर्शनाचा लाभ; अभिषेक आणि सर्व भाविकांना दर्शनाची व्यवस्था
बेळगाव : उत्तर कर्नाटकातील बेळगाव येथील भोई गल्लीमधील प्राचीन व आध्यात्मिक महत्त्व असलेल्या श्री कार्तिक स्वामी मंदिरात कार्तिक पौर्णिमेनिमित्त विशेष दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवार, दि. २३ नोव्हेंबर रोजी पहाटे २.१५ वाजल्यापासून सुरू झालेला हा दर्शन सोहळा मंगळवार, दि. २४ नोव्हेंबर रोजी रात्री ८.२३ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.
कार्तिक महिन्यातील कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी ज्येष्ठा कृत्तिका नक्षत्र असल्याने श्री कार्तिक स्वामींचे दर्शन घेणे अत्यंत शुभ मानले जाते. या विशेष दिवशी मंदिरात श्री कार्तिक स्वामींचा अभिषेक करण्यात येणार असून, सर्व भाविकांना दर्शनाचा लाभ घेता येणार आहे.
या दर्शन सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे महिलांनाही श्री कार्तिक स्वामींच्या दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. वर्षातून केवळ एकदाच अशी संधी मिळत असल्याने भाविकांनी या धार्मिक सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
स्थळ : श्री कार्तिक स्वामी मंदिर, भोई गल्ली, बेळगाव.
अभिषेक करू इच्छिणाऱ्या भाविकांनी रत्ना कौजलगी (मो. ९८८६७६३८२१) यांच्याशी संपर्क साधावा, असे आयोजकांनी कळविले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta