बेळगाव : मंथन कल्चरल अंड सोशल वेल्फेअर सोसायटी व राज्य मराठी विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हास्य तरंग हा स्वरचित हास्य कविता व विडंबन कवितांचा कार्यक्रम वरेरकर नाट्यसंघात शनिवारी ता. ८ ऑगस्ट रोजी संपन्न झाला. व्यासपीठावर मंथनच्या अध्यक्षा प्रिया कवठेकर तसेच प्रमुख वक्ते प्रा. अशोक अलगोंडी, कोषाध्यक्ष पूजा इजारे …
Read More »मंगाई देवीच्या यात्रेचा वडगावात भक्तीचा जागर!
मंगळवारी यात्रोत्सवाचा थाट; महाराष्ट्र-कर्नाटकातील हजारो भाविकांची मांदियाळी : श्रद्धेसोबत व्यापारालाही मिळणार उभारी वडगाव : नवसाला पावणारी आणि वडगावची ग्रामदेवता म्हणून लौकिक असलेल्या श्री मंगाई देवीच्या वार्षिक यात्रेचा जल्लोष मंगळवार, दि. ११ ऑगस्ट रोजी रंगणार आहे. शेकडो वर्षांची परंपरा लाभलेल्या या यात्रेच्या निमित्ताने वडगाव परिसर भक्ती, उत्साह आणि आनंदाच्या …
Read More »आर्थिक फसवणूक प्रकरणातील आरोपीला टिळकवाडी पोलिसांकडून अटक
बेळगाव : तब्बल १६० कोटी रुपयांच्या आर्थिक फसवणूक प्रकरणात सहभागी असल्याच्या आरोपावरून टिळकवाडी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. अर्जुन महादेव वाघमारे (वय ३६, रा. मांगनूर, ता. चिक्कोडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ जुलै २०२६ रोजी अशोक वीरुपाक्षी बिसगुप्पी (वय ४३, रा. कौजलगी, ता. …
Read More »रेल्वेची धडक बसून महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा मृत्यू
बेळगाव : पुणे-बंगळूर (पी.बी.) मार्गावरील तानाजी गल्ली ओव्हरब्रिजजवळ आज दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास रेल्वेची धडक बसून एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला. रोहित रमेश पाटील असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच सोशल वर्कर रेस्क्यू टीम, बेळगावचे सदस्य अवधूत तुडवेकर, पद्मप्रसाद हूळी, शशिकांत अंबेवाडकर, विकी मेहता, …
Read More »खडेबाजार कॉर्नरमधील उघड्या गटारीमुळे अपघाताचा धोका
बेळगाव : शहरातील खडेबाजार कॉर्नर परिसरात रस्त्याच्या मधोमध असलेली उघडी गटार नागरिकांच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरत आहे. या गटारीत मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याने परिसरात अस्वच्छतेची समस्याही निर्माण झाली आहे. या मार्गावर दुचाकींसह इतर वाहनांची मोठी वर्दळ असते. गटाराचा मोठा भाग उघडा असल्याने वाहनचालक तसेच पादचाऱ्यांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. …
Read More »युवा समितीतर्फे कुद्रेमानी शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप
बेळगाव : येथील सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळेत पहिलीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना म. ए. युवा समितीतर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप शनिवारी ( दि.८) करण्यात आले. अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा कमिटी अध्यक्ष दीपक पाटील होते. प्रारंभी मुख्याध्यापक एस. जी. वरपे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. मध्यवर्ती म. ए. समितीचे सदस्य एम. बी. गुरव …
Read More »‘कृतज्ञता हीच खरी उपासना’; निरपेक्ष भावनेने काम करणारा कार्यकर्ता हाच खरा कार्यकर्ता : प्रल्हाद पै
बेळगाव : “आपल्याकडे जे काही आहे ते सद्गुरूंमुळे मिळाले आहे, याची जाणीव ठेवून सद्गुरूंनी दिलेले ज्ञान आचरणात आणले पाहिजे. कोणत्याही पदाची, पैशाची, कौतुकाची किंवा मानाची अपेक्षा न ठेवता निरपेक्ष भावनेने काम करणारा कार्यकर्ता हाच खरा कार्यकर्ता होय,” असे प्रतिपादन जीवनविद्या मिशनचे प्रल्हाद वामनराव पै यांनी केले. जीवनविद्या मिशन, ज्ञानसाधना …
Read More »ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्रामार्फत ज्ञान व मनोरंजनाचा कार्यक्रम उत्साहात
बेळगाव : बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्रामार्फत ज्ञान व मनोरंजनाचा कार्यक्रम डॉ. निता देशपांडे डायबेटिस सेंटर सोमवार पेठ टिळकवाडी येथे उत्साहात संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष विश्वास धुराजी, कार्यवाह सुरेन्द्र देसाई, उपाध्यक्ष के. एल. मजूकर व सहकार्यवाह शिवराज पाटील उपस्थित होते. यावेळी मराठा मंडळ अभियांत्रिकी …
Read More »डी. वाय. चौगुले भरतेश हायस्कूलमध्ये बालक- पालक- शिक्षक मेळावा संपन्न
बेळगाव : भरतेश शिक्षण संस्था संचलित डी. वाय. चौगुले भरतेश हायस्कूल येथे बालक -पालक-शिक्षक मेळावा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी डी. वाय. चौगुले भरतेश हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक तसेच शाळा सुधारणा समितीचे सदस्य श्री. बी. एल. सायनेकर सर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून असे म्हटले की, “पालकांचा …
Read More »ज्योती सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थीनींचा दैदिप्यमान विजय; आंतरशालेय स्पर्धेत प्रथम क्रमांकावर मोहोर!
बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूल, कॅम्प, बेळगाव येथील विद्यार्थीनींनी डिव्हाईन प्रोव्हिडन्स कॉन्व्हेंट हायस्कूल, टिळकवाडी, बेळगाव आयोजित ‘सेंट मॅग्डालेन स्मृती आंतरशालेय स्पर्धा २०२६–२७’ मध्ये उल्लेखनीय यश संपादन करत प्रथम क्रमांक पटकावला. कु. आराध्या रेडेकर हिने चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून शाळेचा नावलौकिक वाढविला. तसेच कु. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta