








मंडळांनी विभागनिहाय क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन
बेळगाव : गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील गणेश मंडळांना वीजविषयक समस्या उद्भवल्यास तातडीने मदत मिळावी, यासाठी हेस्कॉमकडून विभागनिहाय अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मिरवणुकीदरम्यान वीजपुरवठा, विद्युत तारांशी संबंधित अडचणी अथवा अन्य समस्या निर्माण झाल्यास संबंधित विभागातील अधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क साधण्याचे आवाहन हेस्कॉमने केले आहे.
विभागनिहाय संपर्क क्रमांक
१) मध्यवर्ती शहर परिसर : काकतीवेस, शनिवार खूट, गणपत गल्ली, मारुती गल्ली, रामदेव गल्ली, समादेवी गल्ली, ध. संभाजी चौक, रामलिंग खिंड गल्ली, खडेबाजार, किर्लोस्कर रोड, कोनवाळ गल्ली, नार्वेकर गल्ली, हुतात्मा चौक, कसाई गल्ली, कामत गल्ली, केळकरबाग, बापट गल्ली, नरगुंदकर भावे चौक आदी भागांसाठी ०८३१-२४२६६७९. सेक्शन ऑफिसर सय्यद : ९४८०८८१९९२.
२) दुर्गामाता रोड, जुने गांधीनगर, अशोक सर्कल, मध्यवर्ती बसस्थानक, चव्हाट गल्ली, शेरी गल्ली, भडकल गल्ली, बसवण कुडची, अलारवाड, महाद्वार रोड, कपिलेश्वर कॉलनी, समर्थनगर, होसूर, कपिलेश्वर तलाव परिसर : ०८३१-२४२६६७९. सेक्शन ऑफिसर संतोष हैबती : ९४८०८८९९९३.
३) वडगाव, शहापूर, हिंदवाडी, भाग्यनगर : ०८३१-२४८८७००. सेक्शन ऑफिसर शिवानंद गलनगी : ९४८०८८१९९४.
४) अनगोळ, भारतीनगर, टिळकवाडी, जक्कीनहोंड : ०८३१-२४२३८००. सेक्शन ऑफिसर व्यंकटेश कळ्ळीमणी : ९४८०८८१९९५.
५) राणी चन्नम्मानगर, पार्वतीनगर, भवानीनगर, अयोध्यानगर, पहिला रेल्वेगेट, नानावाडी : ०८३१-२४२३०४७ किंवा ९४८०८८२०४६.
६) शिवाजीनगर, सुभाषनगर, गँगवाडी, गणाचारी गल्ली, काळी आमराई, नेहरूनगर : ०८३१-२४७४८२५.
७) कणबर्गी, अंजनेयनगर : ०८३१-२४५४२७२ किंवा ९४८०८८१९९८.
८) ज्योतीनगर, सदाशिवनगर, वैभवनगर, शाहूनगर, सह्याद्रीनगर : ०८३१-२४७४८२५ किंवा ९४८०८८२९९०.
विसर्जन मिरवणुकीदरम्यान वीजविषयक कोणतीही अडचण उद्भवल्यास विलंब न करता संबंधित विभागाच्या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन हेस्कॉमकडून करण्यात आले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta