








बेळगाव : पदवी पूर्व शिक्षण खाते बेळगाव व सरदार गव्हर्मेंट पदवी पूर्व महाविद्यालय बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालयाच्या संघाने उत्कृष्ट क्रीडाकौशल्य दाखवत प्रथम क्रमांक पटकावला.
अंतिम सामन्यात पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालय आणि ज्योती पदवी पूर्व महाविद्यालय यांच्यात अतिशय चुरशीची आणि थरारक लढत पाहायला मिळाली. मात्र पंडित नेहरू महाविद्यालयाच्या खेळाडूंनी अटीतटीच्या या खेळात बाजी मारत अंतिम विजय मिळवला आणि विजेतेपदावर आपले नाव कोरले.
या घवघवीत यशामुळे विजेत्या खेळाडूंचे सर्वत्र कौतुक होत आहे. विश्वभारत सेवा समिती बेळगाव, महाविद्यालयाच्या प्राचार्या, क्रीडा प्रमुख देवकुमार मंगनाकर, शिक्षकवृंद तसेच सर्व विद्यार्थ्यांनी विजेत्या संघाचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. खेळाडूंना संस्थेचे सचिव श्री. प्रकाश नंदिहळी यांचे मोलाचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.
तालुकास्तरीय स्पर्धेत मिळवलेल्या या यशाच्या जोरावर पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालयाचा हा संघ आता दि. २४/०९/२०२६ रोजी रामदुर्ग येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत भाग घेण्यासाठी सज्ज झाला आहे. जिल्हास्तरीय स्पर्धेतही हा संघ अशीच यशोशिखर गाठेल, असा विश्वास महाविद्यालय प्रशासनाने व्यक्त केला आहे.

Belgaum Varta Belgaum Varta