बेळगाव : कौटुंबिक वातावरणानंतर मुलांचे पहिले पाऊल ज्या ठिकाणी पडते, ते म्हणजे नर्सरी शाळा. त्यामुळे बालकांच्या जडणघडणीत आणि संस्कारक्षम शिक्षणात नर्सरी शिक्षणाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. याच उद्देशाने भांदूर गल्ली येथील स्वीटी नर्सरीतर्फे श्री साई दत्त मंदिर, भांदूर गल्ली येथे अक्षराभ्यास संस्कार कार्यक्रम उत्साहात आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला …
Read More »राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्थेतर्फे बिजगर्णी हायस्कूलला वाॅटर फिल्टर भेट
कावळेवाडी… येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्थेतर्फे बिजगर्णी हायस्कूलला वाॅटर फिल्टर भेट देऊन माध्यमिक शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वच्छ पाण्याची सोय करून दिली. हायस्कूलमध्ये शुद्ध पाणी मिळत असल्याने समाधान व्यक्त केले. उपाध्यक्ष एस एम जाधव यांच्या हस्ते पूजन करून उद्घाटन करण्यात आले. निवृत्त मुख्याध्यापक अशोक येटले (वेंगुर्ले) यांनी श्रीफळ …
Read More »बापट गल्लीतील फुटलेल्या ड्रेनेज झाकणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
बेळगाव : शहरातील नागरी सुविधांच्या अभावामुळे नागरिकांना रोजच विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यातच बापट गल्ली येथील कॉर्नरवर अनेक दिवसांपासून ड्रेनेजचे झाकण फुटलेल्या अवस्थेत असून वारंवार तक्रारी करूनही संबंधित यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. सध्या पावसाळ्याचा हंगाम सुरू असल्याने रस्ते, गटारे …
Read More »विद्यार्थ्यांना मोफत बस पास; सीमाभागातील विद्यार्थ्यांनाही लाभ
बेळगाव : राज्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रवास सुलभ व्हावा यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत बस पास देण्यात येणार आहेत. परिवहन खात्याने शुक्रवारी यासंदर्भातील अधिकृत मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या. या योजनेअंतर्गत राज्यातील शाळा, महाविद्यालये तसेच इतर शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या सर्व …
Read More »सीमा ठरावावरून नव्या चर्चेला तोंड; “बेळगाव कर्नाटकातच, मग स्वतंत्र ठरावाची गरज काय?” : खासदार जगदीश शेट्टर
बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेत कर्नाटकाच्या बाजूने सीमा ठराव मंजूर करण्याच्या मागणीवरून सुरू असलेल्या वादात आता बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे. “बेळगाव हा कर्नाटकाचा अविभाज्य भाग असताना महापालिकेत स्वतंत्र ठराव मांडण्याची गरजच काय?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. भाजपच्या पत्रकार परिषदेत बोलताना शेट्टर म्हणाले …
Read More »राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चा २७ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा
बेळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) चा २७ वा वर्धापनदिन गुरुवार, दि. ११ रोजी बेळगाव येथील सर्किट हाऊसमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे नेते प्रकाश मोरे होते. यावेळी बोलताना त्यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष …
Read More »चिन्नास्वामी स्टेडियमची आसनक्षमता अपुरी; बेळगावातही सामने होणार : व्यंकटेश प्रसाद
बेळगाव : बंगळुरूतील एम. चिन्नास्वामी स्टेडियमची सध्याची आसनक्षमता वाढत्या क्रिकेटप्रेमींच्या मागणीसमोर अपुरी पडत असल्याची खंत कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेचे (KSCA) अध्यक्ष वेंकटेश प्रसाद यांनी व्यक्त केली. स्टेडियमच्या आधुनिकीकरणासाठी तयारी सुरू असून यासाठी राज्य सरकारचा पूर्ण पाठिंबा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. बेळगावातील बी.के. मॉडेल कॉलेज येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना …
Read More »विमा रकमेसाठी माजी सैनिकाचा खून प्रकरण; प्रेयसीच्या प्रियकराचा धक्कादायक व्हिडिओ, प्रकरणाला नवे वळण
बेळगाव : हुकेरी तालुक्यातील घोडगेरी गावातील निवृत्त सैनिक संदीप मांजरी यांच्या मृत्यू प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, मृताच्या पत्नीच्या कथित प्रियकराने केलेल्या गंभीर आरोपांमुळे खळबळ उडाली आहे. दोन कोटी रुपयांच्या विमा रकमेसाठी संदीप यांची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त करत पुंडलिक डोंबर याने एक सेल्फी व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. …
Read More »बेळगावात १९ जूनपासून “नो हेल्मेट; नो पेट्रोल” मोहीम लागू
बेळगाव : शहरातील वाढत्या रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी आणि दुचाकीस्वारांच्या सुरक्षिततेस प्राधान्य देण्यासाठी बेळगाव शहर पोलिसांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. “नो हेल्मेट; नो पेट्रोल” या उपक्रमाची अंमलबजावणी १९ जूनपासून करण्यात येणार असून, हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांना पेट्रोल पंपांवर इंधन देण्यात येणार नाही. या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर १५ ते २१ जून …
Read More »21 वी जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न
बेळगांव : बेळगांव जिल्हा रोलर स्केटिंग असो. यांच्यातर्फे 21 वी जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. नुकताच या स्पर्धा ओम नगर शिवगंगा स्पोर्ट्स क्लबच्या स्केटिंग रिंकवर घेण्यात आल्या. ह्या स्पर्धेच्या उद्घघाटन व बक्षीस समारंभला प्रमुख पाहुणे म्हणून समाजसेवक अशोक घागवे व कल्लाप्पा शहापूरकर उपस्थित होते. त्यांच्या शुभ हस्ते …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta