Tuesday , September 22 2026
Breaking News

बाप्पाच्या चरणी सेवा; भोई गल्ली मंडळातर्फे महाप्रसाद

Spread the love

 

बेळगाव : गणरायाच्या चरणी सेवा म्हणून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. याच भावनेतून भोई गल्ली येथील श्री सार्वजनिक बाल गणेशोत्सव मंडळातर्फे रविवारी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी गणहोम, महापूजा तसेच महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.

गणरायाच्या आगमन सोहळ्यापासूनच मंडळातर्फे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. रविवारी आयोजित महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. बाजारपेठेच्या मध्यवर्ती ठिकाणी मंडळ असल्याने परिसरातील तसेच बाजारपेठेत आलेल्या भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाप्रसादाचा स्वीकार केला.

मंडळातर्फे भाविकांना महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मंडळाचे कार्यकर्ते, गल्लीतील महिला मंडळ तसेच भक्तमंडळी यांच्या संयुक्त सहभागातून हा धार्मिक सोहळा उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला.

About Belgaum Varta

Check Also

मंडोळी रोडवर तरुणावर जीवघेणा हल्ला; हल्लेखोर फरार

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांचा कडक बंदोबस्त असतानाही गुन्हेगारी घटनांना आळा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *