








बेळगाव : लेले मैदानावर झालेल्या शहर तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेत सेंट झेवियर्स हायस्कूलच्या १४ वर्षांखालील मुले आणि १७वर्षांखालील मुलींच्या संघाने विजेतेपद पटकावले. दोन्ही संघांनी जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी पात्रता मिळवली असून ते बेळगाव शहराचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
१७ वर्षांखालील मुलींच्या संघाने उपांत्य फेरीत बेन्सन्स स्कूलचा ३-० असा पराभव केला. या सामन्यात मारिया मुजावरने दोन तर अपेक्षा मत्तिकोप्पने एक गोल नोंदवला. अंतिम सामन्यात सेंट झेवियर्स व संत मीरा स्कूल सामना ०-० असा बरोबरीत राहिला. पेनल्टी शूटआऊटमध्ये सेंट झेवियर्सने ३-० असा विजय मिळवला. प्रांजल हजेरी, श्रद्धा पाटील आणि तेजल हांसी यांनी गोल नोंदवले. १४ वर्षांखालील मुलांच्या संघाने उपांत्य फेरीत गोमटेश स्कूलचा २-० असा पराभव केला. फौजान शेख आणि अयान सय्यद यांनी प्रत्येकी एक गोल केला. अंतिम सामन्यात सेंट झेवियर्सने कनक मेमोरियल स्कूलचा १-० असा पराभव करून विजेतेपद पटकावले. मानव शिंदेने निर्णायक गोल नोंदवला.

मुलींच्या संघात उम्मेहानी पठाण, श्रद्धा पाटील, सय्यदा झैनब इनामदार, नीथू प्रजापत, तेजल हांसी, प्रांजल हजेरी, सुदिक्षा मेहत्री मारिया मुजावर, अपेक्षा मत्तिकोप्प, अनाह मारिहाळकर, आराध्या गुडगेनट्टी व वैष्णवी गावडे यांचा सहभाग होता.
मुलांच्या संघात श्री राजगोळकर, अनिकेत पाटील, हुसेन बेपारी, नवीन पिल्लई, मानव शिंदे, फौजान शेख, अयान सय्यद, अथर्व नाडुविनमणी, युसूफ खलिफा, अरव पाटील, वीर हिंदळेकर, झैद मोकाशी, साद मोकाशी, श्रेयस भंडारी, निरव पाटील, राजवीर पाटील, अझीम शेख व कैसर देसाई यांचा सहभाग होता. यशस्वी खेळाडूंना मुख्याध्यापक फादर सिरिल बॅग्स, क्रीडा शिक्षक ज्युलिएट फर्नांडीस, चेस्टर रोझारिओ, प्रशिक्षक रविशंकर मालशेट व मानस नायक यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

Belgaum Varta Belgaum Varta