Tuesday , September 22 2026
Breaking News

गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर २५ सप्टेंबर ते २७ सप्टेंबरपर्यंत दारूबंदी

Spread the love

 

बेळगाव : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी बेळगाव शहर व तालुक्यात दोन दिवस दारू विक्री बंद ठेवण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे. पोलीस आयुक्तांनी यासंदर्भातील आदेश दिला आहे.

यंदाच्या गणेशोत्सवाला १४ सप्टेंबरपासून सुरुवात झाली असून, २५ सप्टेंबर रोजी श्री गणेश विसर्जन मिरवणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने भाविक आणि गणेशभक्त मिरवणुकीत सहभागी होण्याची शक्यता आहे. मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत.

त्यानुसार २५ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजल्यापासून २७ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत बेळगाव शहर व तालुक्यातील सर्व प्रकारच्या मद्यविक्रीवर बंदी राहणार आहे. या कालावधीत मद्यविक्री, वितरण तसेच संबंधित व्यवहारांना प्रतिबंध करण्यात आला आहे.

गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत आणि सुरळीत पार पडावी, यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

सेंट झेवियर्सला फुटबॉलमध्ये दुहेरी मुकुट

Spread the love  बेळगाव : लेले मैदानावर झालेल्या शहर तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेत सेंट झेवियर्स हायस्कूलच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *