








बेळगाव : दिनांक 22 सप्टेंबर रोजी कर्मवीर भाऊराव पाटील जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शाळेतील शिक्षिका स्नेहल बेळगावकर उपस्थित होत्या. यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. ते एक एक सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ होते. सामूहिक शिक्षणाचे पुरस्कर्ते असलेल्या भाऊरावांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. कमवा आणि शिका या तत्त्वज्ञानाची सुरुवात करून त्यांनी मागास जाती आणि अल्प उत्पन्न असलेल्या लोकांना शिक्षित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. ते महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाचे महत्त्वाचे सदस्य होते. तिसरीची विद्यार्थिनी साची श्रीधर सांबरेकर हिने या विचारांवर प्रकाश पाडला.तिसरी ‘ब’ वर्गाच्या वर्गशिक्षिका माधुरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी भित्तिपत्रके तयार केली.
शाळेच्या शिक्षण संयोजिका नीला आपटे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी. जी. पाटील, शिक्षक समन्वयक सविता पवार, सांस्कृतिक विभाग प्रमुख धीरजसिंह राजपूत, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta