Tuesday , September 22 2026
Breaking News

तुरबतीस गलेफानंतर उद्या उरुसाचा मुख्य दिवस : दर्शनासाठी भाविकांची गर्दीच गर्दी

Spread the love

 

 

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील हिंदू-मुस्लिम एकात्मतेचे प्रतीक असलेल्या संत बाबा महाराज चव्हाण प्रस्थापित महान अवलिया हजरत पिरानपीर दस्तगीर साहेब यांच्या उरुसाला दोन दिवसांपासून उत्साहात सुरुवात झाली आहे.

उरुसानिमित्त चव्हाण वाडा येथे चव्हाण वारस, माजी सभापती बाळासाहेब देसाई-सरकार आणि मानकऱ्यांच्या हस्ते तुरबतीर चुना लेपन करण्यात आले. तसेच मानाच्या फकीरांचे स्वागत करून त्यांना भाकरी-भाजीचे भोजन देण्यात आले. मंगळवारी बेडीवाल्यांचा उरूस पार पडला.

बुधवारी (ता. २३) मुख्य उरूस होणार असून त्याची तयारी पूर्ण झाली आहे. मुख्य उरुसानिमित्त कर्नाटक, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावल्याने दर्गा परिसर भाविकांनी फुलून गेला आहे.

मुख्य उरुसाच्या दिवशी दिवसभर कोंबडे व बकऱ्यांचा बळी देऊन नैवेद्य दाखविण्याची परंपरा आहे. त्यामुळे पै-पाहुणे तसेच मित्रमंडळींची वर्दळ वाढली आहे. उरुसानिमित्त विविध शर्यती, करमणुकीचे कार्यक्रम तसेच बाबा महाराज चव्हाण आखाड्यात कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे.

बेळगाव नाक्यापर्यंत विविध प्रकारची खेळणी, पाळणे आणि मनोरंजनाची दुकाने थाटण्यात आली आहेत. सायंकाळी पाच वाजल्यानंतर रात्री उशिरापर्यंत नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.

उरूस सुरळीत पार पाडण्यासाठी कमिटी अध्यक्ष बाळासाहेब देसाई-सरकार, पृथ्वीराज चव्हाण, संग्रामसिंह देसाई, रणजितसिंह देसाई, शरद मळगे, सुजीत गायकवाड, सुहास किल्लेदार, योगेश शहा, कृष्णा पिसे, सेवेकरी निसार मुजावर, वासीम मुजावर, जहीर मुजावर, शकील मुजावर, समीर मुजावर आदी परिश्रम घेत आहेत.

गुरुवारी (ता. २४) शिळा उरूस होणार आहे. सायंकाळी ७ वाजल्यापासून जिजामाता चौकातील चव्हाण वाड्यात खारीक व उदीचा कार्यक्रम होणार आहे. शुक्रवारी (ता. २५) मानाच्या फकीरांची स्वानगी व भंडारखाना होणार असून रविवारी (ता. २७) पाकळणी कार्यक्रमाने उरुसाची सांगता होणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

कुर्लीत कर्मवीर भाऊराव पाटील जयंती व पारितोषिक वितरण कार्यक्रम

Spread the love  निपाणी (वार्ता) : रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *