तलावांसह मिरवणूक मार्गावरील कामे अंतिम टप्प्यात; अधिकाऱ्यांना वेळेत तयारी पूर्ण करण्याच्या सूचना बेळगाव : प्रतिनिधी गणेशमूर्ती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव महानगरपालिका आणि विविध विभागांकडून सुरू असलेल्या अंतिम टप्प्यातील तयारीची महापौर प्रीती कामकर, उपमहापौर हणमंत कोंगाळी आणि पालिका आयुक्त कार्तिक एम. यांनी अधिकाऱ्यांच्या पथकासह पाहणी केली. कपिलेश्वर मंदिर परिसरातील जुना व …
Read More »श्री चांगळेश्वरी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेसाठी निवड
बेळगाव : भगतसिंग हायस्कूल आंबेवाडी मैदानात पार पडलेल्या बेळगांव ग्रामीण तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत श्री चांगळेश्वरी हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी 14 वर्षाखालील खो खो स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे तसेच 17 वर्षाखालील मुलींच्या खो-खो संघाने द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. वैयक्तिक खेळात शाळेचा विद्यार्थी शयन जोतिबा चौगुले 200 मीटर धावणे मध्ये प्रथम, दुर्वा …
Read More »परदेशातही जपली भारतीय संस्कृती; केनियातील वेस्ट व्हॅली शुगर कंपनीत गणेशोत्सव उत्साहात साजरा
केनिया : भारतीय सण आणि संस्कृतीला सातासमुद्रापार घेऊन जाण्याचा अनोखा उपक्रम केनिया स्थित वेस्ट व्हॅली शुगर कंपनीत पाहायला मिळाला. या कंपनीमध्ये विविध तांत्रिक विभागात कार्यरत असलेल्या भारतीय कर्मचाऱ्यांनी एकत्र येत सालाबादप्रमाणे यंदाही गणेशोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला. कंपनीच्या निवासी कॅम्पसमध्ये श्री गणरायाची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली होती. सात दिवस …
Read More »अनंत चतुर्दशीच्या दिवशी परीक्षा न घेता 28 सप्टेंबरला घेण्याची महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची मागणी
बेळगाव : शिक्षण विभागातर्फे 25 सप्टेंबर 2026 रोजी शुक्रवारपासून सहामाही / मध्यावधी परीक्षा सुरू होणार आहेत. मात्र, 25 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी असून याच दिवशी बेळगाव शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात गणपती विसर्जन मिरवणुका काढण्यात येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होण्याची शक्यता लक्षात घेऊन परीक्षेची तारीख बदलण्याची मागणी महाराष्ट्र एकीकरण …
Read More »‘बेळगावचा कैवारी’ मंडपात आज भव्य सामूहिक अथर्वशीर्ष पठण
बेळगाव : गणेशोत्सवाच्या भक्तिमय वातावरणात केळकर बाग येथील ‘बेळगावचा कैवारी’ गणरायाच्या मंडपात गुरुवारी (२४ सप्टेंबर) भव्य सामूहिक अथर्वशीर्ष पठण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ठीक ४ वाजता हा भक्तिमय सोहळा होणार असून, गणरायाच्या चरणी सामूहिक अथर्वशीर्ष पठण करण्यासाठी बेळगावकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले …
Read More »कलाश्रीच्या लकी ड्रॉमध्ये प्रसाद वंटमुरींना कारसह दीड लाखांचे बक्षीस
बेळगाव : उद्यमबाग येथील कलाश्री उद्योग समूहातर्फे आयोजित पाचव्या बक्षीस योजनेच्या लकी ड्रॉमध्ये भाग्यनगर येथील रोटेरियन प्रसाद चंद्रकांत वंटमुरी यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. त्यांना कारसह रोख १ लाख ५० हजार रुपयांचे बक्षीस मिळाले. कलाश्री उद्योग समूहाचे संस्थापक-अध्यक्ष प्रकाश डोळेकर यांच्या हस्ते प्रसाद वंटमुरी यांना कारच्या चाव्या सुपूर्द करण्यात …
Read More »मराठा समाज सुधारणा मंडळाची रविवारी वार्षिक सभा
बेळगाव : मराठा समाज सुधारणा मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. 27 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. मेलगे गल्ली, शहापूर येथील मंडळाच्या वास्तूत सायंकाळी 4 वाजता होणाऱ्या या सभेस मंडळाच्या सर्व आजीव सभासदांनी वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्ष प्रकाश मरगाळे व कार्याध्यक्ष शिवराज पाटील यांनी केले आहे.
Read More »अथणीत भीषण अपघात; २३ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू
अथणी : अथणी शहराच्या बाहेरील मुरगुंडी–अथणी मार्गावरील मध्यवर्ती रस्त्यावर बुधवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात २३ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. मोहन अशोक मिसाळ (वय २३, रा. संबरगी) असे मृत तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विजयपूर–संकेश्वर राष्ट्रीय महामार्गावर दुपारी सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. मोहन हे दुचाकीवरून प्रवास …
Read More »दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत बेळगावातील आणखी चार तालुके
बेळगाव : दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत बेळगाव जिल्ह्यातील आणखी चार तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. राज्य सरकारने बुधवारी (२३ सप्टेंबर) यासंदर्भातील आदेश जारी केला. त्यामुळे जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांची संख्या वाढली आहे. शेतकरी आणि आमदारांकडून करण्यात आलेल्या मागणीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने रामदुर्ग, गोकाक, सौन्दत्ती आणि कागवाड या चार तालुक्यांचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या …
Read More »गणेश विसर्जन तलाव व्यवस्थेची मनपा आयुक्तांकडून पाहणी
दोन दिवसांत सर्व सुविधा पूर्ण करण्याचे निर्देश बेळगाव : गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहरातील विविध विसर्जन तलावांवर सुरू असलेल्या तयारीची महापालिका आयुक्त कार्तिक एम. यांनी बुधवारी अधिकाऱ्यांच्या पथकासह पाहणी केली. कपिलेश्वर तलावासह प्रमुख विसर्जनस्थळांवरील व्यवस्थेचा त्यांनी आढावा घेतला. विसर्जनाच्या दिवशी मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta