Sunday , October 4 2026
Breaking News

परदेशातही जपली भारतीय संस्कृती; केनियातील वेस्ट व्हॅली शुगर कंपनीत गणेशोत्सव उत्साहात साजरा

Spread the love

 

केनिया : भारतीय सण आणि संस्कृतीला सातासमुद्रापार घेऊन जाण्याचा अनोखा उपक्रम केनिया स्थित वेस्ट व्हॅली शुगर कंपनीत पाहायला मिळाला. या कंपनीमध्ये विविध तांत्रिक विभागात कार्यरत असलेल्या भारतीय कर्मचाऱ्यांनी एकत्र येत सालाबादप्रमाणे यंदाही गणेशोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला.

कंपनीच्या निवासी कॅम्पसमध्ये श्री गणरायाची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली होती. सात दिवस चाललेल्या या उत्सवात दररोज सकाळी व संध्याकाळी नित्यनियमाने आरती, भजन आणि मिष्ठान्न भोजनासह महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

या संपूर्ण उत्सवासाठी लागणारा खर्च, आकर्षक डेकोरेशन, गणेशमूर्ती तसेच दररोजचे महाप्रसाद व गोड जेवणाचा खर्च कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सोहेल पटेल साहेब यांनी उचलला.

हा उत्सव यशस्वी करण्यासाठी श्री. अक्रम ढाले, श्री. नेमिनाथ देवानावर, श्री. अमर मुळे, श्री. दिलीप पाटील, श्री. संजय काशीद, श्री. रवी पाटील, श्री. राहुल भोईटे, श्री. युनूस एकसंबे, श्री. संभाजी शेवाळे, श्री. बनकर, श्री. प्रताप पाटील, श्री. सिद्राम आप्पा, श्री. संजय दळवी, श्री. रवी माळी, श्री. शुभम कदम, श्री. स्वप्निल, श्री. सर्वनम, श्री. आनंदा करडी, श्री. शरद लोखंडे, श्री. उदयभान चौधरी, श्री. राजू पाटील, श्री. गजानन मेत्रे आणि श्री. सलीम पठाण यांनी विशेष परिश्रम घेतले.

सातही दिवस पूजा-अर्चा आणि पौरोहित्याची जबाबदारी श्री. आनंदा करडी यांनी सांभाळली. या काळात आणि संपूर्ण श्रावण महिन्यात कॅम्पस आणि कॅन्टीनमध्ये मांसाहार पूर्णपणे बंद ठेवण्यात आला होता.

परदेशात असूनही भारतीय संस्कृतीचा विसर पडू दिला नाही. या उत्सवामुळे आम्हाला आम्ही भारतातच असल्याची अनुभूती आली, अशी भावना उपस्थित कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.

About Belgaum Varta

Check Also

ई-केवायसीमध्ये बेळगाव जिल्हा राज्यात अव्वल

Spread the love  १७.७१ लाख लाभार्थ्यांची प्रक्रिया पूर्ण; १० ऑक्टोबरपर्यंत उर्वरित ४.७३ लाख जणांचे ई-केवायसी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *