Sunday , October 4 2026
Breaking News

श्री चांगळेश्वरी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेसाठी निवड

Spread the love

 

बेळगाव : भगतसिंग हायस्कूल आंबेवाडी मैदानात पार पडलेल्या बेळगांव ग्रामीण तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत श्री चांगळेश्वरी हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी 14 वर्षाखालील खो खो स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे तसेच 17 वर्षाखालील मुलींच्या खो-खो संघाने द्वितीय क्रमांक पटकाविला आहे.
वैयक्तिक खेळात शाळेचा विद्यार्थी शयन जोतिबा चौगुले 200 मीटर धावणे मध्ये प्रथम, दुर्वा संतोष पाटील 700 धावणे मीटर स्पर्धेमध्ये प्रथम लक्ष्मी नायकोजी तिहेरी उडी मध्ये तृतीय क्रमांक पटकाविला आहे.
या सर्व विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शाळेचे क्रीडा शिक्षक एम एम डोंबले यानी केले. या यशाबद्दल चांगळेश्वरी शिक्षण मंडळाचे संस्थापक वाय मजुकर तसेच सचिव प्रसाद मजूकर यांनी विशेष कौतुक करून त्यांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिले आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल गावांमध्ये सर्वत्र कौतुक होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

ई-केवायसीमध्ये बेळगाव जिल्हा राज्यात अव्वल

Spread the love  १७.७१ लाख लाभार्थ्यांची प्रक्रिया पूर्ण; १० ऑक्टोबरपर्यंत उर्वरित ४.७३ लाख जणांचे ई-केवायसी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *