








जमशेदपूर : झारखंडमधील औद्योगिक शहर जमशेदपूर येथे गुरुवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात राज्याच्या ग्रामीण विकासमंत्री दीपिका पांडे सिंह यांच्या मुलीसह चौघांचा मृत्यू झाला.
सोनारी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मरीन ड्राइव्ह मार्गावर पहाटे सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मालवाहू ट्रेलरच्या मागील बाजूस भरधाव कारने जोरदार धडक दिली. धडकेनंतर कार ट्रेलरच्या खाली घुसल्याने तिचा अक्षरशः चक्काचूर झाला.
या दुर्घटनेत कारमधील तिघांसह चौघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये मंत्री दीपिका पांडे सिंह यांची मुलगी त्रिशा सिंह, तसेच सार्थक अग्रवाल, नमन गुप्ता आणि वंशिका खंडेलवाल यांचा समावेश आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. कारमध्ये अडकलेले मृतदेह बाहेर काढण्यासाठी गॅस कटरचा वापर करण्यात आला. सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी एमजीएम रुग्णालयात पाठविण्यात आले असून, पोलिसांकडून अपघाताचा पुढील तपास सुरू आहे.

Belgaum Varta Belgaum Varta