Sunday , October 4 2026
Breaking News

अनंत चतुर्दशीच्या दिवशी परीक्षा न घेता 28 सप्टेंबरला घेण्याची महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची मागणी

Spread the love

 

बेळगाव : शिक्षण विभागातर्फे 25 सप्टेंबर 2026 रोजी शुक्रवारपासून सहामाही / मध्यावधी परीक्षा सुरू होणार आहेत. मात्र, 25 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी असून याच दिवशी बेळगाव शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात गणपती विसर्जन मिरवणुका काढण्यात येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होण्याची शक्यता लक्षात घेऊन परीक्षेची तारीख बदलण्याची मागणी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने केली आहे.

बेळगावमध्ये गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. अनेक कुटुंबांकडून 11 दिवस गणपतीची स्थापना केली जाते आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जन केले जाते. त्याचबरोबर शहरातील विविध सार्वजनिक गणपती मंडळांकडूनही अनंत चतुर्दशीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात विसर्जन मिरवणुका काढण्यात येतात.

या विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी आणि त्यामध्ये सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक तसेच विद्यार्थी व त्यांचे पालक घराबाहेर पडतात. विविध भागांत मिरवणुका आणि गर्दीमुळे वाहतुकीवरही परिणाम होतो. त्यामुळे या दिवशी परीक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर ये-जा करण्यास तसेच शांततेत परीक्षा देण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष श्री अंकुश केसरकर यांनी बेळगाव आणि चिकोडीचे जिल्हा शिक्षणाधिकारी तसेच कर्नाटक शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या सचिवांकडे निवेदन पाठवून 25 सप्टेंबर रोजी नियोजित असलेली परीक्षा पुढे ढकलून सोमवार, 28 सप्टेंबर 2026 रोजी घेण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

विद्यार्थ्यांना कोणतीही गैरसोय होऊ नये तसेच गणेश विसर्जनाच्या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये नागरिकांना सहभागी होता यावे, यासाठी शिक्षण विभागाने या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा, अशी विनंती युवा समितीने केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

ई-केवायसीमध्ये बेळगाव जिल्हा राज्यात अव्वल

Spread the love  १७.७१ लाख लाभार्थ्यांची प्रक्रिया पूर्ण; १० ऑक्टोबरपर्यंत उर्वरित ४.७३ लाख जणांचे ई-केवायसी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *