Sunday , October 4 2026
Breaking News

‘बेळगावचा कैवारी’ मंडपात आज भव्य सामूहिक अथर्वशीर्ष पठण

Spread the love

 

बेळगाव : गणेशोत्सवाच्या भक्तिमय वातावरणात केळकर बाग येथील ‘बेळगावचा कैवारी’ गणरायाच्या मंडपात गुरुवारी (२४ सप्टेंबर) भव्य सामूहिक अथर्वशीर्ष पठण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ठीक ४ वाजता हा भक्तिमय सोहळा होणार असून, गणरायाच्या चरणी सामूहिक अथर्वशीर्ष पठण करण्यासाठी बेळगावकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

गणेशभक्ती, अध्यात्म आणि सामूहिक श्रद्धेचा अनुभव देणाऱ्या या सोहळ्यात सहभागी होऊन गणरायाच्या भक्तीत तल्लीन होण्याची संधी भाविकांना मिळणार आहे. अथर्वशीर्षाच्या मंगलमय स्वरांनी ‘बेळगावचा कैवारी’ मंडप भक्तिरसात न्हाऊन निघणार आहे.

गणेशभक्तांनी कुटुंबीयांसह आवर्जून उपस्थित राहून या भक्तिमय सोहळ्याची शोभा वाढवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

ई-केवायसीमध्ये बेळगाव जिल्हा राज्यात अव्वल

Spread the love  १७.७१ लाख लाभार्थ्यांची प्रक्रिया पूर्ण; १० ऑक्टोबरपर्यंत उर्वरित ४.७३ लाख जणांचे ई-केवायसी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *