Sunday , October 4 2026
Breaking News

गणेश विसर्जन तलाव व्यवस्थेची मनपा आयुक्तांकडून पाहणी

Spread the love

 

 

दोन दिवसांत सर्व सुविधा पूर्ण करण्याचे निर्देश

बेळगाव : गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहरातील विविध विसर्जन तलावांवर सुरू असलेल्या तयारीची महापालिका आयुक्त कार्तिक एम. यांनी बुधवारी अधिकाऱ्यांच्या पथकासह पाहणी केली. कपिलेश्वर तलावासह प्रमुख विसर्जनस्थळांवरील व्यवस्थेचा त्यांनी आढावा घेतला.

विसर्जनाच्या दिवशी मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन गर्दीचे नियोजन, वाहतूक व्यवस्था तसेच गणेशमूर्ती विसर्जनाची प्रक्रिया सुरक्षित आणि सुरळीत पार पडण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

विसर्जनस्थळी क्रेन, पाणी, विद्युत रोषणाई, मंडप आणि ध्वनिवर्धक यंत्रणेची व्यवस्था करण्यासोबतच पोलीस, अग्निशमन दल आणि जीव रक्षक पथकांची नियुक्ती करण्याचे निर्देश देण्यात आले. संबंधित सर्व विभागांमध्ये समन्वय साधून दोन दिवसांत आवश्यक त्या सर्व सुविधा पूर्ण कराव्यात, असेही आयुक्त कार्तिक एम. यांनी स्पष्ट केले.

तयारी पूर्ण झाल्यानंतर पुन्हा विसर्जन तलावांची पाहणी करून अंतिम टप्प्यातील व्यवस्थेचा आढावा घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी महापालिका अभियंता लक्ष्मी निप्पाणीकर, नगरसेवक राजू भातकांडे, गिरीश धोंगडी, मंगेश पवार यांच्यासह महापालिका अधिकारी आणि स्थानिक नेते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

ई-केवायसीमध्ये बेळगाव जिल्हा राज्यात अव्वल

Spread the love  १७.७१ लाख लाभार्थ्यांची प्रक्रिया पूर्ण; १० ऑक्टोबरपर्यंत उर्वरित ४.७३ लाख जणांचे ई-केवायसी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *