Sunday , October 4 2026
Breaking News

सफाई कामगारामुळे नागरिकांचे आरोग्य सुरक्षित

Spread the love

 

सहकाररत्न उत्तम पाटील ; बोरगावमध्ये सफाई कामगारांचा सत्कार

निपाणी (वार्ता) : बोरगाव पट्टण पंचायत क्षेत्रातील नागरिकांना दैनंदिन जीवनात आवश्यक असलेल्या विविध सेवा सुरळीतपणे मिळून त्यांचे आरोग्य सुरक्षित राहावे, यासाठी साफसफाई कर्मचारी व कामगारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. स्वच्छता, देखभाल, सार्वजनिक सुविधा, विविध नागरी मुलभूत कामांमध्ये सफाई कामगार प्रामाणिकपणे व जबाबदारीने कर्तव्य बजावत आहेत. त्यांचे काम अनेकदा पडद्यामागे राहते, मात्र नागरिकांच्या जीवनात त्यांच्या कार्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. उन्हाळा, पावसाळ्यासह कोणत्याही परिस्थितीत नागरिकांच्या सेवेसाठी सातत्याने कार्यरत राहणाऱ्या प्रत्येक कर्मचारी व कामगाराच्या योगदानाचा सन्मान होणे आवश्यक आहे. सफाई कामगारामुळेच नागरिकांचे आरोग्य सुरक्षित आहे, असे मत सहकार रत्न उत्तम पाटील यांनी केले.

येथील पट्टण पंचायत कार्यालयात सफाई कामगार दिनानिमित्त सहकार रत्न उत्तम पाटील यांच्या हस्ते पट्टण पंचायतीतील कर्मचाऱ्यांचा बुधवारी (ता.२३) सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी उत्तम पाटील, नगराध्यक्ष दिगंबर कांबळे, नगरसेवक अभय मगदूम यांनी बोरगाव पंचायत मधील सर्व सफाई कामगारांचा सत्कार केला. कार्यक्रमास नगराध्यक्ष दिगंबर कांबळे, नगरसेवक अभय मगदूम, उपाध्यक्ष रुखसना अफराज, पट्टणपंचायत अधिकारी स्वानंद तोडकर, नगरसेवक, बोरगाव सफाई कामगार संघटनेचे अध्यक्ष रक्मान गजरे, हिम्मत अपराज, अरुण शिंगे, महालिंग गजरे, बाळव्वा कांबळे, प्रमोद गजरे, अजिंक्य हिरेमणी, महनतेंश कांबळे यांच्यासह कर्मचारी, पदाधिकारी उपस्थित होते. दरी फिरगन्नावर यांनी सूत्रसंचालन केले. महादेव कांबळे यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

ऑक्टोबरमध्ये सण-उत्सवांची पर्वणी

Spread the love  सर्वपित्री अमावास्येपासून नवरात्र, दसरा, कोजागरी, करवा चौथ निपाणी (वार्ता) : ऑक्टोबर महिन्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *