








निपाणी (वार्ता) : निपाणी येथील हजरत पिराने पीर दस्तगीर साहेब यांच्या उरूसानिमित्त बुधवारी (ता.२३) आयोजित जनरल बैलगाडी शर्यतीमध्ये ननदी येथील अभी स्वामी यांच्या बैलगाडीने प्रथम क्रमांक पटकावून रोख १० हजार रुपयांचे बक्षीस मिळविले. या शर्यतीत वाघापूर येथील साताप्पा आरडे यांच्या बैलगाडीने द्वितीय क्रमांक मिळवून रोख ७ हजार रुपयांचे बक्षीस पटकाविले. तर निपाणीतील सचिन काटकर यांच्या बैल जोडीने तृतीय क्रमांक मिळवून रोख ५ हजार रुपयांचे बक्षीस पटकावले.
येथील अंमलझरी रोडवरील डॉ. आंबेडकर नगर मध्ये झालेल्या या शर्यतीचे उद्घाटन ऊरुस कमिटी अध्यक्ष, माजी टाऊन प्लॅनिंग अध्यक्ष बाळासाहेब देसाई सरकार, माजी नगराध्यक्ष विलास गाडीवडर, माजी सभापती डॉ. जसराज गिरे, संग्रामसिंह देसाई, रणजीतसिंह देसाई, सुजित गायकवाड व मानवरांच्या हस्ते करण्यात आले.
जनरल घोडा- बैलगाडी शर्यतीत विशाल वारके -अक्कोळ, राहुल खोत- कोडणी आणि आदर्श काटकर-निपाणी यांच्या गाड्यांनी अनुक्रमे ५ हजार रुपये, ३ हजार रुपये आणि २ हजार रुपयांची बक्षीस मिळवली.
जनरल घोडा -गाडी शर्यतीत विकास कांबळे- निपाणी, ओमकार केसरकर-निपाणी आणि प्रतीक कांबळे -निपाणी यांनी अनुक्रमे ७ हजार रुपये, ५ हजार रुपये आणि ३ हजार रुपयांची बक्षीस हे पटकवले. व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस देण्यात आली.
यावेळी संभाजी मुगळे, डॉ. सचिन काटकर, अतिश शिंदे, विश्वास माळी, आनंद लोकरे, बसवकुमार जयकर, श्रीकांत माळगे, दादासाहेब कांबळे, प्रतिक मुगळे, चेतन माने, युवराज जयकर, बंडा कांबळे, गौतम कांबळे, उदय माने यांच्यासह शर्यती कमिटीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. धर्मा कांबळे यांनी सूत्रसंचालन केले.

Belgaum Varta Belgaum Varta