बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ‘वंदे मातरम्’च्या १५०व्या वर्धापन दिनानिमित्त ‘नमामी भारत – एक समय, एक लय, एक स्वर या भावनेतून एकत्र येऊया’ या प्रेरणादायी संकल्पनेवर आधारित कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि देशभक्तीमय वातावरणात पार पडला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सौरभ कुलकर्णी उपस्थित होते. शाळेचे अध्यक्ष परमेश्वर हेगडे, …
Read More »बेपत्ता तरुणाचा मृतदेह नंदगडजवळ आढळला; मृत्यूमागे अनेक प्रश्नचिन्हे
बेळगाव : गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या बेळगाव शहरातील २७ वर्षीय तरुणाचा मृतदेह खानापूर तालुक्यातील नंदगड-दांती गावाजवळ आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सर्वेश कंग्राळकर असे मृत तरुणाचे नाव आहे. तो शहरातील मारुती गल्ली, सांबरा रोड परिसरातील रहिवासी होता. मिळालेल्या माहितीनुसार, २० सप्टेंबर रोजी सायंकाळी सार्वजनिक गणेशोत्सव पाहण्यासाठी जात असल्याचे …
Read More »श्री विठ्ठल मंदिरात अथर्वशीर्ष, विष्णुसहस्रनाम पठण
बेळगाव : गणेशोत्सवानिमित्त वडगाव येथील श्री विठ्ठल मंदिरात भक्तिमय वातावरणात श्री गणपती अथर्वशीर्ष व विष्णुसहस्रनामाचे सामूहिक पठण करण्यात आले. श्री विठ्ठल मंदिर महिला भजन मंडळाच्या वतीने या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महिला भजन मंडळाच्या सदस्यांनी मंदिरात एकत्रितपणे अथर्वशीर्षाचे पठण केले. यावेळी परिसरातील महिला भगिनी मोठ्या संख्येने सहभागी …
Read More »मराठा लाईट इन्फंट्रीच्या गणरायाचे पारंपरिक पद्धतीने विसर्जन
बेळगाव : द मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरच्या गणपतीचे अर्गन तलाव येथे पारंपरिक पद्धतीने धार्मिक, उत्साहपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात विसर्जन करण्यात आले. मिलिटरी महादेव मंदिरापासून अर्गन तलावापर्यंत गणेश विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत पारंपरिक लेझीम, झांज-पथक तसेच उत्साहपूर्ण मराठी लोकनृत्यांनी सहभागींचे लक्ष वेधून घेतले. तालबद्ध वाद्यांच्या गजरात जवान आणि …
Read More »गणेश विसर्जनावेळी मच्छे येथे युवकाचा बुडून मृत्यू
बेळगाव : शहरालगतच्या मच्छे गावात गणेश विसर्जनावेळी पाण्यात बुडून १८ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी घडली. विश्वनाथ नाईक असे मृत युवकाचे नाव आहे. गणेशमूर्ती विसर्जनासाठी गेलेल्या विश्वनाथ नाईकने विसर्जनावेळी पाण्यात प्रवेश केला. यावेळी तो पाण्यात बुडाला. उपस्थितांनी त्याला पाण्यातून बाहेर काढण्यासाठी तातडीने प्रयत्न केले. मात्र, त्याचा मृत्यू …
Read More »सहकार क्षेत्रामुळेच देशाचा विकास : ‘विवेकानंद’ची १५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात
बेळगांव : सहकार क्षैत्रामुळेच व्यक्तीबरोबरच देशाचाही विकास झाला, असे मत बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष कृष्णा शहापूरकर यांनी व्यक्त केले. येथील कॉलेज रोडवरील सुप्रसिद्ध विवेकानंद मल्टीपर्पज सौहार्द को-ऑप. सोसायटीची पंधरावी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी (२३ सप्टेंबर) रोजी उत्साहात पार पडली. यावेळी शहापूरकर बोलत होते. चेअरमन कुमार पाटील अध्यक्षस्थानी …
Read More »डॉ. सुचेता कुलकर्णी यांना ‘भारत नारी शक्ती गौरव’ सन्मान
शैक्षणिक क्षेत्रातील मौलिक योगदानाची दखल; बेळगाव एज्युकेशन सोसायटीकडून अभिनंदन बेळगाव : बेळगाव एज्युकेशन सोसायटी संचालित बी.के. मॉडेल इंग्रजी माध्यम स्कूलच्या प्राचार्या डॉ. सुचेता कुलकर्णी यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय आणि मौलिक योगदानाबद्दल ‘भारत नारी शक्ती गौरव सन्मान’ प्रदान करण्यात आला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शैक्षणिक तसेच सामाजिक क्षेत्रातून त्यांच्यावर …
Read More »श्रीमूर्ती विसर्जनाला सुरुवात : माळी गल्लीच्या ‘बेळगावचा लंबोदर’ गणेशमूर्तीचे विसर्जन
बेळगाव : माळी गल्ली येथील एसएसजीयू मंडळाच्या ‘बेळगावचा लंबोदर’ सार्वजनिक श्री गणेशमूर्तीची विसर्जन मिरवणूक गुरुवारी दुपारी ३ वाजता उत्साहात काढण्यात आली. पारंपरिक व भक्तिमय वातावरणात मिरवणूक मार्गक्रमण करत दुपारी ३.३० वाजता गणेशमूर्तीचे नवीन कपिलतीर्थ तलावात विसर्जन करण्यात आले. सार्वजनिक गणेशमूर्ती विसर्जनापूर्वी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी श्री गंगा पूजन केले. त्यानंतर सार्वजनिक …
Read More »आमदार चन्नराज हट्टीहोळी यांच्याकडून हेस्कॉम अधिकाऱ्यांना मारहाण?
बेळगाव : थकीत वीज बिलामुळे स्टोन क्रशरचा वीजपुरवठा खंडित केल्याच्या कारणावरून हेस्कॉमच्या दोन अधिकाऱ्यांना निवासस्थानी बोलावून मारहाण केल्याचा गंभीर आरोप विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांच्यावर करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी बेळगावातील कुवेम्पूनगर येथील त्यांच्या निवासस्थानी घडल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणात हेस्कॉमचे एईई दीपक डी. …
Read More »जितेंद्र रेडेकर यांचा ‘भावनांचे भोळे पक्षी’ कार्यक्रम आणि कवी संमेलनाचे शनिवारी आयोजन
बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या प्रेरणेने शब्दगंध कवी मंडळ संघ, बेळगाव यांच्या वतीने ‘भावनांचे भोळे पक्षी’ हा कवी जितेंद्र रेडेकर यांच्या कवितांचा विशेष कार्यक्रम तसेच उपस्थितांचे खुल्या काव्यसंमेलनाचे आयोजन शनिवार, दि. २६ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजता शहीद भगतसिंग सभागृह, गिरीश कॉम्प्लेक्स, रामदेव …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta