Sunday , October 4 2026
Breaking News

डॉ. सुचेता कुलकर्णी यांना ‘भारत नारी शक्ती गौरव’ सन्मान

Spread the love

 

शैक्षणिक क्षेत्रातील मौलिक योगदानाची दखल; बेळगाव एज्युकेशन सोसायटीकडून अभिनंदन

बेळगाव : बेळगाव एज्युकेशन सोसायटी संचालित बी.के. मॉडेल इंग्रजी माध्यम स्कूलच्या प्राचार्या डॉ. सुचेता कुलकर्णी यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय आणि मौलिक योगदानाबद्दल ‘भारत नारी शक्ती गौरव सन्मान’ प्रदान करण्यात आला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शैक्षणिक तसेच सामाजिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

नीती आयोगाच्या सहकार्याने नवी दिल्ली येथील वर्दी वेलनेस फाउंडेशन ट्रस्ट यांच्या वतीने डॉ. कुलकर्णी यांना हा प्रतिष्ठेचा सन्मान प्रदान करण्यात आला. शिक्षण क्षेत्रात त्यांनी केलेले योगदान, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविलेले उपक्रम तसेच शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले.

डॉ. सुचेता कुलकर्णी यांच्या या यशाबद्दल बेळगाव एज्युकेशन सोसायटीच्या संचालक मंडळाने त्यांचे विशेष अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

About Belgaum Varta

Check Also

प्रा. आर. एस. पाटील यांची ‘Achievers of Karnataka’ पुरस्कारासाठी निवड

Spread the love  खानापूर : शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *