Friday , November 6 2026
Breaking News

बेळगाव

बेळगाव नागरी सहकारी पतसंस्था पुणे वार्षिक सभा उत्साहात

  सभासदांना १२ टक्के लाभांश; आदर्श पतसंस्था पुरस्काराने गौरव पुणे : बेळगावकरांनी पुणेस्थित बेळगावकरांसाठी स्थापन केलेल्या बेळगाव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सन ७७, लक्ष्मीनारायण पार्क, शॉप नं. ११, ससाणेनगर, हडपसर, पुणे-२८ या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, दि. २७ सप्टेंबर २०२६ रोजी वडगाव खु, पुणे येथील क्रांतीज्योत महिला प्रतिष्ठान, स्वर्गीय …

Read More »

पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालयाच्या कुस्तीपटूंचे जिल्हास्तरीय स्पर्धेत दैदिप्यमान यश; पाच खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड!

  ​बैलहोंगल / बेळगाव : पदवी पूर्व शिक्षण खाते बेळगाव आणि के. एल. ई. पदवी पूर्व महाविद्यालय, बैलहोंगल यांच्या संयुक्त विद्यमाने बेळगाव येथील स्पोर्ट्स हॉस्टेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालयाच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले आहे. या स्पर्धेत चमक दाखवणाऱ्या पाच …

Read More »

भरकटलेल्या तरुणांना योग्य दिशा देण्यासाठी गल्लीवार बैठका घेणार

  मराठा समाज सुधारणा मंडळाच्या वार्षिक सभेत निर्णय; शैक्षणिक निधी उभारण्यावरही भर बेळगाव : मराठा समाजातील भरकटलेल्या तरुणांना योग्य मार्गदर्शन करून त्यांना सकारात्मक दिशा देण्यासाठी गल्लीवार व विभागवार बैठका घेऊन विचारमंथन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मराठा समाज सुधारणा मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत एकमताने घेण्यात आला. मेलगे गल्ली, शहापूर येथील मंडळाच्या सभागृहात …

Read More »

‘भावनांचे भोळे पक्षी’ काव्यमैफिलीने बेळगावकर रसिक मंत्रमुग्ध

  कवी जितेंद्र रेडेकर यांच्या भावस्पर्शी कवितांना दाद : शब्दगंध कवी मंडळ संघातर्फे कार्यक्रमाचे आयोजन बेळगाव : शब्दगंध कविमंडळ संघ, बेळगावतर्फे आयोजित आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या प्रेरणेने ‘कवी समजून घेतांना’ या उपक्रमांतर्गत (पुष्प १० वे) “भावनांचे भोळे पक्षी” हा कवी जितेंद्र रेडेकर यांच्या काव्यवाचनाचा विशेष कार्यक्रम शनिवारी …

Read More »

दगडाने ठेचून महिलेची निर्घृण हत्या; बैलहोंगलजवळ खळबळ

  बेळगाव : बैलहोंगल शहराच्या बाहेरील अमटूर–नयनगर जोडणाऱ्या कच्च्या रस्त्यावर एका महिलेची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याची घटना रविवारी उघडकीस आली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मृत महिलेची ओळख लक्ष्मी राजू माडमगेरी (३१), रा. गोल्लर गल्ली, बैलहोंगल अशी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तींनी महिलेवर दगडाने जीवघेणा हल्ला करून …

Read More »

सुलभा बुलबुलेंचा गरजू विद्यार्थिनींच्या शिक्षणासाठी पुढाकार

  बेळगाव : महिला विद्यालय हायस्कूल मराठी व प्रभाताई देशपांडे इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील माजी कर्मचारी श्रीमती सुलभा वसंत बुलबुले यांनी गरजू व होतकरू विद्यार्थिनींच्या शैक्षणिक मदतीसाठी १ लाख २० हजार रुपयांची देणगी दिली. या प्रसंगी संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला संस्थेचे चेअरपर्सन ॲड. सचिन बिच्चु, व्हाईस चेअरपर्सन डॉ. …

Read More »

ऋषिकेश पाटील यांना अमेरिकेतील विद्यापीठाची पीएचडी

  बेळगाव : विजयनगर येथील कै. एस. एस. पाटील (सेवानिवृत्त प्राचार्य, न्यू इंग्लिश स्कूल, चंदगड) तसेच टिळकवाडी येथील कै. एम. टी. पाटील (सेवानिवृत्त मुख्याध्यापक व आदर्श सोसायटीचे उपाध्यक्ष) यांचे नातू ऋषिकेश प्रमोद पाटील यांना अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना स्टेट युनिव्हर्सिटीने डॉक्टरेट (पीएचडी) पदवी प्रदान केली. ऋषिकेश यांनी संगणक क्षेत्रातील अत्याधुनिक क्वांटम …

Read More »

महात्मा गांधी संस्थेतर्फे निबंध लेखन स्पर्धा उत्साहात संपन्न

  कावळेवाडी : येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्था व राज्य मराठी विकास संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने निबंध लेखन स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. बिजगर्णी हायस्कूल मध्ये या स्पर्धा आयोजित केल्या. अध्यक्षस्थानी निवृत्त क्रीडा शिक्षक के आर भास्कर उपस्थित होते. इशस्तवन स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात केली. महात्मा गांधी फोटो पूजन …

Read More »

एपीके फाईल पाठवून कंपनी कर्मचाऱ्याला ९९ हजारांचा गंडा

  मोबाईल हॅक करून बँक खात्यातून रक्कम लंपास; सायबर पोलिसांत गुन्हा दाखल बेळगाव : सॉफ्टवेअर अपडेटच्या नावाखाली पाठविण्यात आलेल्या एपीके फाईलच्या माध्यमातून एका खाजगी कंपनीतील कर्मचाऱ्याच्या बँक खात्यातून तब्बल ९९ हजार रुपये लंपास करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शहर सायबर क्राईम विभागात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांबरा …

Read More »

जिल्हास्तरीय शालेय मुला-मुलींच्या फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ

  बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खात्याच्यावतीने आयोजित टिळकवाडी येथील सुभाष चंद्रबोस लेले मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय मुला -मुलींच्या फुटबॉल स्पर्धेला रविवारी शानदार प्रारंभ झाला. सदर स्पर्धेत 9 संघांनी भाग घेतला आहे. स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून महापौर प्रीती कामकर, विनायक कामकर, माजी उपमहापौर आनंद चव्हाण, रमेश सिंगद, …

Read More »