Monday , October 5 2026
Breaking News

पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालयाच्या कुस्तीपटूंचे जिल्हास्तरीय स्पर्धेत दैदिप्यमान यश; पाच खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड!

Spread the love

 

​बैलहोंगल / बेळगाव : पदवी पूर्व शिक्षण खाते बेळगाव आणि के. एल. ई. पदवी पूर्व महाविद्यालय, बैलहोंगल यांच्या संयुक्त विद्यमाने बेळगाव येथील स्पोर्ट्स हॉस्टेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालयाच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले आहे. या स्पर्धेत चमक दाखवणाऱ्या पाच खेळाडूंची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
​या स्पर्धेत महाविद्यालयाच्या खालील खेळाडूंनी आपापल्या वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावून राज्यस्तरीय स्पर्धेत आपले स्थान पक्के केले:
​श्रावणी पाटील – ५९ किलो फ्री स्टाईल कुस्ती (प्रथम क्रमांक)
​यश शिगेंहळ्ळीकर – ६१ किलो फ्री स्टाईल कुस्ती (प्रथम क्रमांक)
​राजवीर बिर्जे – ७२ किलो ग्रीको रोमन कुस्ती (प्रथम क्रमांक)
​वेदांत मासेकर – ८६ किलो फ्री स्टाईल कुस्ती (प्रथम क्रमांक)
​ध्रुव खाजगोनट्टी – ८७ किलो ग्रीको रोमन कुस्ती (प्रथम क्रमांक)
​तसेच, प्रतिक पाटील याने ७९ किलो फ्री स्टाईल गटात आणि अबरार अनगोळकर याने ७४ किलो फ्री स्टाईल गटात द्वितीय क्रमांक पटकावून महाविद्यालयाच्या यशात भर घातली.
​या सर्व विजेत्या खेळाडूंना विश्वभारत सेवा समिती संस्थेचे सचिव श्री. प्रकाश नंदिहळी, महाविद्यालयाचे क्रीडाप्रमुख देवकुमार मंगनाकर आणि महाविद्यालयाच्या प्राचार्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
​खेळाडूंच्या या शानदार यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, महाविद्यालयाचा शिक्षक व शिक्षकेतर वृंद तसेच सर्व विद्यार्थ्यांनी विजेत्या कुस्तीपटूंचे अभिनंदन करून पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

About Belgaum Varta

Check Also

डॉ. शिवाजी कागणीकर यांच्या ‘सर्वोदयाचा वाटसरू’ आत्मचरित्राचे प्रकाशन

Spread the love  मेधा पाटकर यांच्या हस्ते बेळगावात लोकार्पण; ग्रामस्वराज्य, जलसंधारण आणि सामाजिक न्यायाच्या कार्याचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *