Tuesday , October 6 2026
Breaking News

जीवनाच्या लढाईसाठी सर्कसीमध्ये कसरती!

Spread the love

 

कोप्पळ येथील पवार कुटुंबीयांचे हाल : अस्तित्व टिकवण्यासाठी लढा

निपाणी (वार्ता) : एकेकाळी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आकर्षणाचा आणि मनोरंजनाचा केंद्रबिंदू असलेली सर्कस आता काळाच्या ओघात अस्तित्वासाठी संघर्ष करत आहे. गावात सर्कस दाखल झाली की निर्माण होणारा उत्साह, तंबूबाहेरची गर्दी आणि थरारक कसरतींची उत्सुकता आजच्या डिजिटल युगात कमी होत चालली आहे.

कोप्पळ येथील हनुमंत पवार आणि बसवंत पवार यांच्या कुटुंबीयांनी बेनाडी येथे सर्कशीच्या माध्यमातून विविध थरारक कसरती सादर करून ग्रामस्थांना मंत्रमुग्ध केले. या कुटुंबाने सर्कसकलेची परंपरा जपताना उदरनिर्वाहासाठी करावा लागत असलेला संघर्षही यावेळी मांडला. कोणतेही प्रवेशशुल्क न आकारता ग्रामस्थांनी स्वेच्छेने दिलेली मदत स्वीकारण्यात आली.

सर्कशीमध्ये महिलेच्या पोटावर मोठा दगड ठेवून हातोड्याने तो फोडणे, हाताच्या जोरावर मोठा दगड फोडणे, मशाल पेटवून अंगावरील कपडे इस्त्री करणे, माकड आणि कुत्र्यांची कुस्ती, दातांनी सायकल पकडून त्यावर मुलाला बसवून फेरी मारणे, डोळ्याच्या पापणीने सुई उचलणे, जमिनीवर झोपलेल्या पाच मुलांवरून हात न टेकवता उडी मारणे, तसेच जमिनीवर हात न ठेवता पुढे आणि मागे उड्या मारणे अशा विविध कसरती सादर करण्यात आल्या. या थरारक प्रात्यक्षिकांना नागरिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.

——————————————————————-

वाघ, सिंह, हत्ती, अस्वल घोडे यांचे चित्तथरारक खेळ असायचे. मात्र, प्राणी छळ प्रतिबंधक कायद्यांतर्गत सर्कसमध्ये हिंस्त्र आणि वन्य प्राण्यांच्या वापरावर बंदी घालण्यात आली. त्यामुळे प्रेक्षकांचा, विशेषतः लहान मुलांचा सर्कसकडे पाहण्याचा ओढा कमी झाला आहे. ‘डिजिटल’ युगात मोबाईल, इंटरनेट, ओटीटी लॅटफॉर्म्स, व्हिडिओ गेम्स आणि मल्टिप्लेक्स थिएटर्समुळे लोकांना घरबसल्या एका क्लिकवर जागतिक दर्जाचे मनोरंजन उपलब्ध झाले आहे. झाल्याने सर्कसला उतरती कळी लागली आहे.
– हनुमंत पवार, सर्कस चालक, कोप्पळ

About Belgaum Varta

Check Also

नवरात्रोत्सवासाठी मंडप, देखावे उभारणीला वेग

Spread the love  रोषणाईने शहर उजळणार; गरबा-दांडियासह धार्मिक सांस्कृतिक कार्यकम निपाणी (वार्ता) : नवरात्रोत्सवाच्या प्रारंभासाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *