Sunday , September 20 2026
Breaking News

बेळगाव

मराठी विद्यानिकेतन पूर्व प्राथमिक विभागातर्फे स्वातंत्र्याचा जागर उत्सव साजरा

  बेळगाव : शुक्रवार, दिनांक १४ ऑगस्ट २०२६ रोजी मराठी विद्यानिकेतन शाळेतील खेळगट, अंकुर, शिशु व इयत्ता १ ली विभागातील मुलांनी स्वातंत्र्याचा जागर उत्सव अत्यंत उत्साहात साजरा केला. यावेळी पूर्वप्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी भारत देशाच्या नकाशाची ओळख करून घेतली, तसेच स्वतः रेखाटलेल्या राष्ट्रीय प्रतिकांचे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर गीते गायली. …

Read More »

शिवानंद नीलण्णावर यांना १२ दिवसांची ईडी कोठडी

  बेळगावातील शिवम असोसिएट्स फसवणूक प्रकरण; २,११० कोटी रुपयांच्या कथित गैरव्यवहाराचा तपास सुरू बेंगळुरू : बेळगावातील शिवम असोसिएट्स फसवणूक प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शिवानंद नीलण्णावर यांना अटक केली आहे. मंगळूरू विभागातील ईडी अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईनंतर मंगळूरू येथील विशेष ईडी न्यायालयाने नीलण्णावर यांना २४ ऑगस्टपर्यंत १२ दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे. …

Read More »

जिल्हा क्रीडांगणावर उद्या स्वातंत्र्यदिनाचा जल्लोष

  मंत्री, खासदार, आमदारांची उपस्थिती; सकाळी ध्वजारोहण, सायंकाळी विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी बेळगाव : देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन जिल्हा प्रशासनातर्फे शनिवार, दि. १५ ऑगस्ट रोजी नेहरूनगर येथील जिल्हा क्रीडांगणावर उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमाची जय्यत तयारी प्रशासनाकडून करण्यात आली असून, विविध मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाला …

Read More »

शॉपिंग उत्सवाचा शानदार प्रारंभ

  बेळगाव : “गेल्या वीस वर्षे होऊन अधिक काळ सातत्याने नवनवीन उत्पादने बेळगावकरांना उपलब्ध करून देणे हे कौशल्याचे काम आहे हे काम यश कम्युनिकेशन्स करीत आहे बेळगावकरांनी भेट देऊन प्रदर्शनातील वस्तूंची पाहणी करावी आणि प्रोत्साहन द्यावे” असे आवाहन चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज चे उपाध्यक्ष राजेंद्र मुतगेकर यांनी शुक्रवारी सायंकाळी केले. …

Read More »

वास्तुशास्त्राच्या ज्ञानातून सकारात्मक वातावरण निर्मितीचा संदेश

  बेळगाव : क्रेडाई वुमेन्स विंग, बेळगावतर्फे सिटी कोऑर्डिनेटर करुणा हिरेमठ आणि सेक्रेटरी सविता सायनेकर यांच्या पुढाकारातून काकती येथे वास्तुशास्त्र विषयावरील विशेष ज्ञानवर्धक सत्राचे आयोजन करण्यात आले. पंचतत्त्व अ‍ॅस्ट्रो अँड वास्तुचे विनायक विजय ओगले यांनी उपस्थितांना वास्तुशास्त्रातील विविध तत्त्वांची सविस्तर माहिती दिली. महिलांना घर तसेच व्यावसायिक जागांचे योग्य नियोजन, दिशांचे …

Read More »

भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त; प्रशासनाचा ॲक्शन प्लॅन तयार

  दोन-तीन महिन्यांत निर्जंतुकीकरण, लसीकरण व स्थलांतर; प्रत्येक प्रभागात ‘फीडिंग पॉइंट’चीही व्यवस्था बेळगाव : शहरासह जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या आणि त्यांच्याकडून नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने आता ठोस पावले उचलली आहेत. भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर केवळ तात्पुरती उपाययोजना न करता निर्जंतुकीकरण, लसीकरण, निवारा आणि अन्नाची व्यवस्था असा सर्वंकष …

Read More »

श्रावण आला… बाजारपेठ फुलली!

  सणांची मांदियाळी सुरू; स्वातंत्र्यदिनाच्या खरेदीला उधाण, तिरंगी साहित्याने बाजारपेठ सजली बेळगाव : श्रावणाच्या आगमनाबरोबरच सण-समारंभांची चाहूल लागली आणि शहरातील बाजारपेठांनाही उत्साहाचे भरते आले. नागपंचमी, स्वातंत्र्यदिन, रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा आणि ईद-ए-मिलाद असे सलग सण येत असल्याने बाजारपेठा ग्राहकांच्या गर्दीने गजबजल्या आहेत. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला तर खरेदीसाठी नागरिकांनी बाजारपेठेत मोठी गर्दी केली. …

Read More »

राकसकोप जलाशय तुडुंब; महापौर, उपमहापौरांच्या हस्ते गंगापूजन

  बेळगाव : शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारे राकसकोप जलाशय तुडुंब भरले आहे. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या वतीने आज शुक्रवारी महापौर प्रीती कामकर, उपमहापौर हणमंत कोंगळी आणि आयुक्त कार्तिक एम. यांच्या हस्ते गंगापूजा करण्यात आले. यावेळी बोलताना महापौर प्रीती कामकर म्हणाल्या, जलाशय तुडुंब भरल्या नंतर गंगापूजन एक आनंदाचा क्षण आहे. शहरातील …

Read More »

फ्रेंचायजीच्या आमिषाने बेळगावच्या महिलेची १ कोटी ६५ लाखांची फसवणूक

  बेळगाव : नामांकित कंपनीची फ्रेंचायजी देण्याचे आमिष दाखवून बेळगावातील एका महिलेची तब्बल १ कोटी ६५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशातील ‘फॅब्रिको क्लिनिंग सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीच्या नावाने हा प्रकार घडला असून, याप्रकरणी उद्यमबाग पोलिसांनी १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पार्वतीनगर येथील श्वेता …

Read More »

विद्यार्थ्यांना करिअरची दिशा देणारे मार्गदर्शन व्याख्यान उत्साहात संपन्न

  बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था, मुंबई आणि गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी, बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना शिक्षणानंतरच्या विविध करिअरच्या संधींची माहिती मिळावी, आपल्या आवडीनिवडी व क्षमतांचा विचार करून योग्य क्षेत्राची निवड करता यावी, या उद्देशाने हा उपक्रम घेण्यात आला. …

Read More »