Sunday , October 4 2026
Breaking News

अनैतिक संबंधाच्या वादातून हत्या : महिलेसह तिघांना अटक

Spread the love

 

अथणी : अनैतिक संबंधाच्या वादातून एका व्यक्तीची हत्या केल्याप्रकरणी अथणी पोलिसांनी एका महिलेसह तिघांना अटक केली आहे. मृत व्यक्तीची गळा आवळून हत्या करण्यात आल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

रणवीर आनंदसिंग राजपूत याची २१ सप्टेंबर रोजी रात्री बळ्ळीगेरी गावात गळा आवळून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी २२ सप्टेंबर रोजी मृताचा भाऊ नारायण दत्तासिंग राजपूत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अथणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

तपासादरम्यान श्रीदेवी हिंदूसिंग राजपूत हिच्यावर पोलिसांना संशय आला. रणवीर आपल्याला लैंगिक हेतूने त्रास देत असल्याचे श्रीदेवीने पोलिसांना सांगितल्याचे समोर आले आहे. तिने तिचा जुना शाळेतील मित्र भैरू श्रीमंत पवार याला याबाबत माहिती दिली होती.

तपासानुसार, घटनेच्या सुमारे १५ दिवस आधी श्रीदेवीने भैरू पवारला बळ्ळीगेरी येथे बोलावून रणवीरचे घर दाखवले होते. तसेच घटनेच्या दिवशी रणवीर घरात एकटाच असल्याची माहितीही त्याला दिली होती.

२१ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे ७.३० वाजता भैरू पवार दुचाकीवरून रणवीरच्या घरी गेला. दुचाकी सुरू होत नसल्याचे सांगून त्याने रणवीरला घराबाहेर बोलावले. त्यानंतर त्याचा गळा आवळून हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

बेळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक के. रामराजन, अतिरिक्त पोलिस अधीक्षक आर. बी. बसर्गी आणि अथणी डीवायएसपी प्रशांत मुन्नोळी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. अथणी सर्कलचे सीपीआय संतोष डी. हल्लूर आणि पीएसआय गिरीमल्लप्पा उप्पार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

About Belgaum Varta

Check Also

ई-केवायसीमध्ये बेळगाव जिल्हा राज्यात अव्वल

Spread the love  १७.७१ लाख लाभार्थ्यांची प्रक्रिया पूर्ण; १० ऑक्टोबरपर्यंत उर्वरित ४.७३ लाख जणांचे ई-केवायसी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *